Accident : सोनकेतील अपघातात मोटार सायकलस्वार ठार

ओमणी गाडी व मोटार सायकल समोरासमोर धडक होवून मोटार सायकलस्वार जागीच ठार झाला.
Accident
Accidentsakal

तिसंगी - सोनके, ता. पंढरपूर नजीक दु. १२ वाजणेचे सुमारास ओमणी गाडी व मोटार सायकल एचएफ डिलक्स समोरासमोर धडक होवून मोटार सायकलस्वार प्रशांत पाटील जमखंडी, बेळगाव जागीच ठार झाला आहे. तर वारीसाठी कराड इस्लामपूरहुन निघालेले भावीक जखमी झाले आहेत. त्याना शासकिय रूग्नालय पंढरपूर येथे दाखल करण्यात आले आहे.

सोनके, ता. पंढरपूर येथे कराड इस्लामपूरहुन ओमणी एमएच 10 सीए 4510 व मोटार सायकलस्वार पंढरपूर हुन एमएच 13 डीआर 5673 जात असताना समोरासमोर जोराची धडक बसलेने प्रशांत पाटील जागीच ठार झाले. कार्तिकी वारी कालावधी असलेने रस्त्यावर मोठी गर्दी होती. तात्काळ पीएसआय दिलिप शिंदे व सहकारी पोलिस यंत्रणेणे दखल घेवू अपघात क्षेत्रातील वाहणे बाजुलल करुन रस्ता रिकामा केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com