कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी ‘शिवरायांचे आपण मावळे...’

A song performed by a professor of Karamla In the background of Corona
A song performed by a professor of Karamla In the background of Corona

करमाळा (सोलापूर) : जगभर धुमाकुळ घातलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी सध्या लॉकडाऊन सुरु आहे. यातच होम फ्रॉम वर्कचा भाग म्हणून करमाळा तालुक्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्रा. प्रदीप मोहिते यांनी ‘शिवरायांचे आपण मावळे...’ हे गीत सादर केले आहे. सोशल मीडियावर या गीत व्हायरल होत आहे.
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात कोरोना विरूद्ध मानव असे युद्ध सुरू आहे. आपण सर्व भारतीय लोक हे युद्ध प्राणपणाने लढत आहोत. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपणा सर्वांना घराबाहेर न पडण्याचा आदेश दिला आहे.  ते योग्य आहे. या युद्धसदृश परिस्थितीत छत्रपती शिवरायांच्या गनिमी कावा या युद्धतंत्राची आठवण करुन करमाळा तालुक्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्रा. प्रदीप मोहिते यांनी गीत सादरक केले आहे. 

प्रा. मोहिते म्हणाले, ‘कोरोनाविरूद्ध सुरू असलेले हे युद्ध जिंकण्यासाठी आपणही गनिमी काव्याचे तंत्र वापरून म्हणजे घरी बसून कोरोनापासून स्वतः ला व देशाला वाचवले पाहिजे. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सहकुटुंब घरीच आहे. वर्क फ्रॉम होमचा एक भाग म्हणून कोरोनासंदर्भात शिवरायांचे आपण मावळे हे गीत लिहिले आहे. या गीताचे सादरीकरण त्यांची कन्या सोनिया, मुक्ता, अनुश्री आणि पत्नी प्रा. डॉ. संगीता पैकेकरी यांच्या सहकार्याने त्यांनी सादर केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com