
South Solapur tragedy: Woman dies a day after delivery; doctor and nurse face FIR after 3 years.
Sakal
सोलापूर : प्रसूतीसाठी माहेरी तांदुळवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथे आलेल्या अमृता विजय माने हिला २२ ऑगस्ट २०२२ रोजी पोटात दुखू लागल्याने १०८ रुग्णवाहिकेतून रात्री साडेअकराला बोरामणी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. एलन मलिक तांबोळी व आरोग्य सेविका अर्चना सिद्राम तोडकर या दोघींच्या निष्काळजीपणामुळे अमृताचा मृत्यू झाला. तीन वर्षांनी दोघींविरुद्ध सोलापूर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पण, दाखल कलमानुसार सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असल्याने त्यांना नोटीस बजावली जाणार आहे.