
सोलापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाकडे एकूण ६६३ बसगाड्या आहेत. त्यातील २६० गाड्या खास आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी सोडण्यात येणार आहेत. वारीसाठी बसगाड्या दिल्याने अनेक मार्गांवरील वाहतूक विस्कळीत होणार आहे, पण शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी ज्या मार्गावर अधिक आहेत त्या मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.