

A mesmerizing view of migratory birds dancing over Achkadani lake in Sangola — a heaven for nature lovers and photographers.
Sakal
सांगोला : तालुक्यातील अचकदाणी तलाव परिसरातील वन्यभागात ‘स्वर्गीय नर्तक’ या नावाने प्रसिद्ध एशियन पॅराडाईज फ्लायकॅचर (Asian Paradise Flycatcher – Terpsiphone paradisi) या आकर्षक स्थलांतरित पक्ष्याचे नुकतेच आगमन झाले आहे. निसर्गसंपन्न तलाव परिसर आणि वनराईने वेढलेले अचकदाणी हे गाव स्थलांतरित पक्ष्यांसाठी स्वर्गच बनले आहे.