
-राजकुमार शहा
मोहोळ : पालखी सोबत पायी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्याला एका इनोव्हा गाडीने धडक देऊन झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. हा अपघात शेटफळ माढा मार्गावर मंगळवार ता 1 जुलै रोजी रात्री दहा वाजता घडला. आकाश कश्णाराव कोंडलकर वय 30 रा हनुमान मंदिर, बालाजी वार्ड, गोपालपुरी चंद्रपूर असे मृत वारकऱ्याचे नाव आहे. या अपघाताची नोंद मोहोळ पोलिसात झाली आहे.