
Goseva Yajna in Solapur revives over 2,000 cows and calves ahead of Vasubaras celebrations in 42 gaushalas.
Sakal
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याने गो-संवर्धनामध्ये मोठे काम केले आहे. जिल्ह्यातील ४२ गोशाळांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे २ हजार गायी व वासरांना जीवदान मिळाले आहे. शहरातून आणि जिल्ह्यातून भटक्या गायींची संख्या वाढत असतानाच, पकडलेल्या वासरांचे जगण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. यामुळे गो-संवर्धनाचे काम आव्हानात्मक बनले आहे.