esakal | सोलापुरातून पुण्यासाठी दर दोन तासाला एसटी ! इतर जिल्ह्यांसाठी "हे' आहे वेळापत्रक 
sakal

बोलून बातमी शोधा

ST Bus

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासूनच महामंडळाच्या वतीने खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. प्रत्येक फेरीनंतर बसचे निर्जंतुकीकरण, वाहक, चालक यांना मास्क व सॅनिटायझर वापराला प्राधान्य देण्यात आले आहे. सोलापूर विभागातून इतर जिल्ह्यांसाठी पूर्वी ज्याप्रमाणे बस सोडण्यात येत होत्या, त्याप्रमाणेच बस सोडल्या जातील. 

सोलापुरातून पुण्यासाठी दर दोन तासाला एसटी ! इतर जिल्ह्यांसाठी "हे' आहे वेळापत्रक 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे 22 मार्चपासून जिल्ह्याच्या बाहेर एसटी वाहतूक बंद करण्यात आली होती. राज्य सरकारने जिल्ह्याच्या बाहेर आजपासून (गुरुवार) एसटी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर आगारातून आजपासून दर दोन तासाला पुण्यासाठी बस सोडण्यात येणार असल्याची माहिती सोलापूरचे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली. 

हेही वाचा : वंचित बहुजन आघाडीचा जल्लोष ! जिल्हाबाहेर जाणाऱ्या पहिल्या "एसटी'ची आतषबाजीने रवानगी 

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासूनच महामंडळाच्या वतीने खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. प्रत्येक फेरीनंतर बसचे निर्जंतुकीकरण, वाहक, चालक यांना मास्क व सॅनिटायझर वापराला प्राधान्य देण्यात आले आहे. सोलापूर विभागातून इतर जिल्ह्यांसाठी पूर्वी ज्याप्रमाणे बस सोडण्यात येत होत्या, त्याप्रमाणेच बस सोडल्या जातील. सोलापुरातून कोल्हापूर, औरंगाबाद यासह महत्त्वाच्या शहरांत आजपासून बस सोडण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यातील शटल सेवेमध्ये प्रवासी गरज बघून प्रत्येक तासाला बस सोडण्याचेही नियोजन सोलापूर विभागाने केले आहे. 

हेही वाचा : मोठी ब्रेकिंग! "या' 37 साखर कारखान्यांना सरकारची विनाअट थकहमी 

महामंडळाच्या अकलूज आगाराने देखील आंतरजिल्हा प्रवास वाहतूक सेवेचे नियोजन केले आहे. आगार व्यवस्थापक तानाजी पवार म्हणाले, अकलूज येथून चिपळूण, स्वारगेट-पुणे, याबरोबरच सोलापूर, सांगोला, पंढरपूर, टेंभुर्णी, नातेपुते, बारामती येथे प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे. अकलूज-चिपळूण दररोज 11 वाजता, अकलूज-कोल्हापूर दररोज 10.45 वाजता, अकलूज ते स्वारगेट- पुणे, सोलापूर, सांगोला व पंढरपूर येथे प्रत्येक दोन तासाला बस सोडण्यात येणार आहे. टेंभुर्णी आणि नातेपुते येथे प्रत्येक एक तासाला तर नातेपुते-बारामती प्रत्येक दोन तासाला एसटी बससेवा असणार आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असल्याने सोलापूर महत्त्वाचे 
मराठवाड्यातून पश्‍चिम महाराष्ट्रात व कोकणात जाण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातूनच जावे लागते. त्यामुळे सोलापूर जिल्हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मराठवाड्यातील अनेक बस सोलापुरातून जातात. प्रवाशांच्या मनातील कोरोनाबद्दलची भीती व एसटीच्या प्रवाशाबद्दल सुरक्षिततेचा विश्‍वास देण्यासाठी सोलापूर विभाग प्रयत्नशील असल्याची माहितीही सोलापूरचे विभाग नियंत्रक गायकवाड यांनी दिली. 

संपादक : श्रीनिवास दुध्याल

महाराष्ट्र 

loading image
go to top