बुधवारी 52 सेकंदासाठी जागेवरच थांबा! सोलापूर शहरात होणार सामुहिक राष्ट्रगीत गायन

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने बुधवारी (ता. 17) सकाळी 11 वाजता सर्वांना जिथे असाल तिथे थांबावेच लागेल. 52 सेकंद आपल्या देशाचे राष्ट्रगीत गायन त्यादिवशी होणार आहे. पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी सोलापूर शहरात त्याचे नियोजन केले आहे.
Police Superidendent Rajendra Mane, Latur News
Police Superidendent Rajendra Mane, Latur News Sakal
Updated on

सोलापूर : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने बुधवारी (ता. 17) सकाळी 11 वाजता सर्वांना जिथे असाल तिथे थांबावेच लागेल. 52 सेकंद आपल्या देशाचे राष्ट्रगीत गायन त्यादिवशी होणार आहे. पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी सोलापूर शहरात त्याचे नियोजन केले आहे. त्यादिवशी सकाळी 11 वाजता रस्त्यांवरील सर्व वाहतूक सिग्नल 'रेड' केले जातील.

देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने विविध उपक्रम राबविले जात आहेत. 'हर घर तिरंगा' हा त्याचाच एक भाग आहे. सर्व घटकातील नागरिकांसह विविध जाती-धर्मातील लोकांमध्ये राष्ट्रभावना रुजावी या हेतूने शासनाच्या निर्देशानुसार 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 11.52 या वेळेत सामुहिक राष्ट्रगीत गायन होईल. त्यावेळी रस्त्यांवरील सिग्नल थांबवले जाणार आहेत. पोलिसांच्या मदतीने वाहनातील नागरिकांना 52 सेकंदासाठी खाली उतरवले जाणार आहे. तसेच जे लोक घरी असतील त्यांनीदेखील राष्ट्रगीत गायन करावे, असे अपेक्षित आहे. दरम्यान, आयुक्तालयाने 7 ते 8 हजार नागरिकांना मोफत राष्ट्रध्वज दिले आहेत.

आयुक्तालयाची डोळ्याचे पारणे फेडणारी चित्रफित

पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या पुढाकाराने शहर पोलिस आयुक्तालयाने एक चित्रफित तयार केली आहे. लोकांमध्ये राष्ट्रभावना जागृत व्हावी, लोकांना पोलिसांचे काम, संघर्ष, लोकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची मेहनत त्या चित्रफित व्हिडिओद्वारे मांडली आहे. पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे यांनी अतिशय सुरेख आवाजात गीत गायन केले आहे. त्यात तिरंगा फडकवताना सगळे पोलिस अधिकारी दिसत आहेत. पोलिस दलातील सर्व विभागाचे दर्शन त्यात दिसते. सप्रसिद्ध गायक मोहम्मद अय्याज यांनी त्या चित्रफितीत आवाज दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur-pune highway
solapur
solapur issues of voters
farmer loan waiver scheme issue
Marathi News Esakal
www.esakal.com