सोलापूर - सोलापूरचे सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, व्यापारी आणि लोकप्रतिनिधी यांची दीर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेली सोलापूर ते मुंबई विमानसेवेची मागणी सप्टेंबर 2025 अखेरपर्यंत पूर्ण होत आहे..'डीजीसीए'कडून स्टार एअरला सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू करण्याची परवानगी मिळालेली आहे. महाराष्ट्र एअरपोर्ट ऑथॉरिटी यांच्याशीही स्टार एअरचा करार झालेला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली..महाराष्ट्र एअरपोर्ट ऑथॉरिटीचा स्टार एअरशी करार झाल्याने सोलापूर ते मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होत आहे. स्टार एअर लवकरच तिकीट विक्रीला सुरुवात करून साधारणतः सप्टेंबर 2025 अखेरपर्यंत सोलापूरहून मुंबईला पहिले प्रवासी विमानाचे उड्डाण होईल. ही विमानसेवा सुरू झाल्यास सोलापूरचा औद्योगिक, व्यापारी, पर्यटन व शैक्षणिक विकास होण्यास मोठा प्रमाणावर चालना मिळणार आहे..राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नुकताच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 'उडान' योजनेअंतर्गत 14 कोटीची व्हायाबिलिटी गॅप फडिंगची तरतुद करुन सोलापूर-पुणे-मुंबई विमानसेवा सुरु करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.