Solapur News : शनिवारी सोलापुरात अंनिसची राज्य बैठक

ही बैठक सम्राट चौकातील हिराचंद नेमचंद कार्यालयात होईल
Solapur News
Solapur Newsesakal

सोलापूर ः महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारणी बैठक शनिवार (ता.८) व रविवार (ता.९) रोजी होणार आहे.ही बैठक सम्राट चौकातील हिराचंद नेमचंद कार्यालयात होईल अशी माहिती राज्य कार्यकारणी सदस्य मिलिंद देशमुख, मुक्ता दाभोलकर, राहुल थोरात, प्रा. अशोक कदम, अण्णा कडलास्कर, उषा शहा यांनी दिली.

Solapur News
Accident News: कंटेनरच्या धडकेत मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

या राज्य कार्यकारणी बैठकीमध्ये संघटनेच्या विभागवार कामाचा आढावा घेतला जाईल. या बैठकीसाठी राज्यभरातील पदाधिकारी व क्रियाशील कार्यकर्ते असे मिळून २५० लोक उपस्थित राहणार आहेत. बैठकीचे उद्घाटन शनिवारी (ता.८) सकाळी १० वा. माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या हस्ते होईल. यावेळी नेत्रतज्ञ डॉ. उमा प्रधान या उपस्थित राहतील. त्यानंतर अहवाल वाचन होईल.

Solapur News
Nashik News : भरतीसाठी निवडणूक शाखेकडून मार्गदर्शन मागविले; ‘आरोग्यवर्धिनी’, आपला दवाखाना प्रकल्पासाठी कर्मचाऱ्यांची गरज

सायं.५ वाजता डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटल्याच्या निकालाचा अन्वयार्थ' यावर मुक्ता आणि हमीद दाभोलकर, मिलिंद देशमुख, फारुख गवंडी विचार व्यक्त करणार आहेत. त्यानंतर देणगीदार व जाहिरातदारांचा सत्कार सासवड माळी शुगर्सचे चेअरमन राजेंद्र गिरमे यांच्या यांच्या हस्ते होईल.

सायं. ७ वाजता भारतीय मुसलमान आणि अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर इतिहास अभ्यासक सरफराज अहमद यांचे व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी डॉ. शैला दाभोलकर या राहतील. रविवारी (ता.९) सकाळी साडेसहा वाजत निर्भय मॉर्निंग वॉक काढला जाणार आहे. या बैठकीचा समारोप दुपारी २ वा. शिवाजी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व शल्यक्रिया तज्ञ डॉ. बी.वाय. यादव यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यावेळी लेखक प्रा.डॉ.अर्जुन व्हटकर, मानसोपचारतज्ञ डॉ. कृष्णा मस्तूद हे राहणार आहेत. यावेळी विविध ठराव मंजूर केले जातील. या कार्यक्रमास अंनिसच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सोलापूर जिल्हा अंनिसने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com