राजन पाटील, बळीराम काका अन्‌ यशवंत मानेंची पालकमंत्र्यांविरूध्द तक्रार

राजन पाटील, बळीराम काका अन्‌ यशवंत मानेंची पालकमंत्र्यांविरूध्द तक्रार
Esakal
Summary

जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर आमच्याकडे थांबत नाहीत, वेळ देत नाहीत, आम्हाला बैठकांना आम्हाला बोलवत नाहीत, काही ठरावीक लोकांनाच वेळ देतात, त्यांचीच कामे करतात, अशा स्वरूपाची तक्रार पालकमंत्र्यांविरूध्द पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे केली आहे.

सोलापूर : जिल्ह्यातील माळशिरस, करमाळा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, सांगोला व मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाचे प्राबल्य असल्याने त्याचा फायदा राष्ट्रवादी पक्षाला होईल, या हेतूने इंदापूरचे आमदार व मंत्री दत्तात्रय भरणे (guardian minister dattatray bharane) यांच्याकडे पालकमंत्रीपदाची धुरा देण्यात आली. आता नव्या पालकमंत्र्यांची वर्षपूर्ती होण्यापूर्वीच जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी आमची कामे न करता ठरावीक लोकांचीच कामे करतात, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी ते विश्‍वासात घेत नाहीत, अशी तक्रार (Complaint) केली आहे. त्यात आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांची नावे असल्याची चर्चा आहे.(a complaint has been lodged against guardian minister dattatray bharane)

राजन पाटील, बळीराम काका अन्‌ यशवंत मानेंची पालकमंत्र्यांविरूध्द तक्रार
मंत्री दत्तात्रय भरणे यांना भाजी मंडईत अचानक पहाताच अनेकांची भंबेरी उडाली; पण....

पालकमंत्रीपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर दत्तात्रय भरणे यांना साडेचार महिने आचारसंहितेमुळे तर सात महिने कोरोनाच्या लॉकडाउनमुळे जिल्ह्यासाठी काहीच निर्णय घेता आले नाहीत. तरीही, जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर आमच्याकडे थांबत नाहीत, वेळ देत नाहीत, आम्हाला काहीच कल्पना न देताच बैठका घेतात, बैठकांना आम्हाला बोलवत नाहीत, काही ठरावीक लोकांनाच वेळ देतात, त्यांचीच कामे करतात, अशा स्वरूपाची तक्रार पालकमंत्र्यांविरूध्द काही नेत्यांनी थेट पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे केल्याची चर्चा आहे. परंतु, आगामी काळात जिल्हा परिषद व महापालिकेची निवडणूक असल्याने सध्या पालकमंत्री बदलणे कठीण आहे, अशी चर्चा मुंबईतील बैठकीत झाल्याचीही चर्चा आहे.

राजन पाटील, बळीराम काका अन्‌ यशवंत मानेंची पालकमंत्र्यांविरूध्द तक्रार
'या' कोविड सेंटरमधील कोरोना रुग्णांच्या आनंददायी प्रतिसादाने पालकमंत्री दत्तात्रय भरणे भारावले ! वाचा 

दरम्यान, मी साधा माणूस असून सर्वसामान्यांसाठी काम करतो, पक्षवाढीचा सातत्याने प्रयत्न करतो, संघटन मजबूत होण्यासाठीच माझा प्रयत्न असतो. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, पक्षाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमी काम करतो. कोणाचेही मन दुखावण्याचा अथवा त्यांच्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करण्यामागे कोणताही हेतू नाही, असे पालकमंत्री भरणे यांनी 'सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले.

राजन पाटील, बळीराम काका अन्‌ यशवंत मानेंची पालकमंत्र्यांविरूध्द तक्रार
निधी मायनसमध्ये सांगणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईची गरज - दत्तात्रय भरणे

पालकमंत्री मंत्रालय सोडून पवारांच्या भेटीला

आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणूक, जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेऊन रणनिती आखण्याच्या दृष्टीने मंगळवारी (ता. 8) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबई पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी पालकमंत्र्यांबद्दल त्यांच्याकडे आलेल्या तक्रारींची शहानिशा झाली. दरम्यान, शरद पवार यांनी पालकमंत्र्यांना फोन करून तत्काळ बोलावले. त्यावेळी मंत्रालयात असलेले पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे पवार यांच्या भेटीला निघाले. त्यांनी पालकमंत्र्यांकडून तक्रारींबद्दल विचारले आणि त्यांना सबुरीचा सल्ला दिला. तसेच शहरातील पदाधिकाऱ्यांच्या पालकमंत्र्यांबद्दल काही तक्रारी आहेत का, अशीही त्यांनी विचारणा केली. त्यावेळी उपस्थित शहरातील पदाधिकाऱ्यांनी काहीच तक्रारी नसल्याचे त्यांना सांगितले.

राजन पाटील, बळीराम काका अन्‌ यशवंत मानेंची पालकमंत्र्यांविरूध्द तक्रार
पालखी सोहळा अध्यात्मिक पर्वणी : आमदार दत्तात्रय भरणे

उध्दव ठाकरे यांच्या ग्रीन सिग्नलशिवाय महेश कोठेंचा राष्ट्रवादी प्रवेश नाहीच

शिवसेनेतील गटतट आणि कुरघोडीच्या राजकारणाला वैतागून महेश कोठे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाट धरली. त्यांचा अजूनही राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश झालेला नाही. तरीही, मागील काही महिन्यांपासून ते राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांना आवर्जुन हजेरी लावत आहेत. दरम्यान, मुंबईतील बैठकीलाही ते हजर होते. त्यावेळी तुम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष व्हायला इच्छूक असल्याचे समजल्याचे शरद पवार यांनी कोठेंना विचारले. परंतु, मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सांगण्यावरून कोठेंचा पक्षप्रवेश थांबला आहे. कोठे हे राष्ट्रवादीत गेल्यानंतर शहरातील शिवसेनेची ताकद कमी होऊन महापालिकेत त्यांचे अस्तित्व राहणार नाही. त्यामुळे कोठेंचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील पक्षप्रवेश थांबल्याची चर्चा आहे. दरम्यान, कोठे हे राष्ट्रवादीत गेल्यानंतर त्यांचे समर्थक नगरसेवकदेखील पक्ष सोडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कोठेंची राष्ट्रवादी प्रवेशाची वाट खडतर मानली जात आहे. (a complaint has been lodged against guardian minister dattatray bharane)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com