
सोलापूर : पावसाळा सुरु झाला की अनेकजण छत्री व रेनकोटची खरेदी करतात. छत्री आणि रेककोटचा उपयोग पावसापासून संरक्षण करणे एवढाच. काहीजण उन्हाळ्यात सावलीसाठी म्हणून छत्री वापरतात. आता रेनकोट व छत्र्या वेगवेगळ्या रंगात बाजारात उपलब्ध होतात. यांच्या स्टाईलने आबालवृध्दापर्यंत वेड लावले आहे. वेगवेगेळ्या प्रकारच्या छत्री आणि रेनकोट आल्याने त्यामध्ये आवडनिवड आलीच.
पावसाळी सुरु झाली की फक्त रेनकोट आणि छत्रीच नाही तर पावसाळी चप्पल ही अनेकजण खरेदी करतात. पावसाळा सुरु होतानाच दरवर्षी शाळाही सुरु होतात. त्यामुळे मुलांना दप्तर घेण्याबरोबर छत्री व रेनकोट घेतले जातात. कॉलेज, ऑफिस, व्यवसायासाठी घराबाहेर पडताना दुचाकीवर जाण्यासाठी अनेकजण रेनकोट खरेदीला पसंती देतात. पण ती पहिली खरेदी करताना रेनकोट कसला घ्यायचा? शर्ट- पँट स्टाइलचा घ्यायचा की वन पीस घ्यायचा, यावरही चर्चा होतात. रेनकोटमध्येही कपड्यांसारखेच रंग, आकार यांमध्ये वैविध्य दिसून येते. कपड्यांप्रमाणेच रेनकोटही ट्रेंडी असावेत, याची काळजी घेतली जाते. मग तरुणाईचा कल रेक्झिनची जर्कीन आणि पँटकडे असतो, तर काही जण प्लास्टिकच्या रेनकोटला प्राधान्य देतात. अगदीच रिमझिम किंवा धोधो बरसणारा पाऊस असो, पाण्याचे तुषार झेलून आपल्याला बऱ्यापैकी शुष्क ठेवणाऱ्या या वस्त्राची कूळकथा अतिशय रंजक अशीच आहे.
ग्रामीण भागात आजही पावसाळी सुरु झाला की, शेळ्या सांभळणारे पावसात अंगावर घोंगता (घडीकरुन पोते) घेतात. भारतात फेटे, पगड्या आणि फारच श्रीमंत असतील तर छत्री यांचा वापर पावसापासून बचावासाठी केला जायचा. सध्या आपण वारतो तशा, पण गवतापासून बनवलेल्या छत्र्या चीनमध्ये वापरल्या जात असत. चिनी लोक पावसापासून बचावासाठी गवतापासून विणलेला अंगरखा आणि टोप्या वापरत. डोक्यावरच टोपीसारखी घालायची छत्रीही तेथे वापरात होती. हाता काहीजण प्लास्टीकचाही वापर करतात. छत्री वापरण्याचे श्रेय चिनी लोकांकडे जाते. चिनमध्ये जलरोधक कपड्याचा धागाच बनवायचा विचार रुजला होता. तसाच दक्षिण अमेरिकेतील आदिम जमातींनाही ठाऊक होता. दक्षिण अमेरिकेतील जंगलांमध्ये रबराची झाडे भरपूर होती. त्यामुळे तेथील लोक या झाडांचा चीक (कच्चे रबर) थेट कपड्यांना लावीत.
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार सध्या आधुनिक रेनकोट वापरले जात आहेत. युरोपात विज्ञानाने बऱ्यापैकी मजल मारली होती, तर तंत्रज्ञान प्राथमिक टप्प्यात विकसित होत होते. रबराचे दोन तुकडे एकत्र जोडल्यास जलरोधक थर तयार होतो, हे चार्ल्स मॅकिन्तॉश याने शोधून काढले. रबर नाप्थामध्ये बुडवून त्याने हा प्रयोग केला. या जलरोधक रबराला मॅकिन्तॉशचेच नाव देण्यात आले. आजही हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या कॉटवर बेडशीटखाली जे रबर आच्छादले जाते, त्याला मॅकिन्तॉश म्हणण्याची पद्धत आहे. मॅकिन्तॉशने बनवलेले रबर वापरून काही कंपन्यांनी रेनकोट बनवले. मात्र त्याला दर्जा नसल्याने मॅकिन्तॉशचे नाव खराब होऊ लागले. ते टाळण्यासाठी स्वतःच कोटचे उत्पादन करावे, असा आग्रह काहींनी त्याच्याकडे धरला. त्यानंतर त्याने स्वतःच कोट बनविणारी कंपनी स्थापन करून कोटचे उत्पादन सुरू केले. १८२४ मध्ये मॅकिन्तॉशचा पहिला जलरोधक रेनकोट बाजारात आला. त्यानंतर शोध लागला तो रबराचे व्हल्कनायझेशन करण्याचा (नैसर्गिक रबर किंवा धाग्यावर प्रक्रिया करून त्यांना अधिक टिकाऊ बनविण्याची प्रक्रिया). व्हल्कनायझेशन करण्याचे पेटंट ब्रिटनमधील थॉमस हॅन्कॉक आणि अमेरिकेतील चार्ल्स गुडइयर यांच्याकडे स्वतंत्रपणे होते. या पैकी गुडइयरने टायर बनविण्यासाठी या तंत्राचा वापर केला, तर हॅन्कॉकने रेनकोटचे उत्पादन सुरू केले. पुढे मॅकिन्तॉश कंपनी १८३० मध्ये हॅन्कॉनच्या कंपनीत विलीन झाली. हॅन्कॉक १८१९ पासून रबराचे लेपन केलेल्या धाग्यांविषयी प्रयोग करीत होता. त्याच्या कंपनीने उत्पादित केलेले रेनकोट ब्रिटिश पोलिस, लष्कर आणि रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी वापरले जात. एकोणिसाव्या शतकातील या रेनकोटमध्ये काही उणिवा होत्या. एक तर ते पूर्णपणे जलरोधक नसत. दुसरे त्यातील रबर कडक उन्हात वितळत असे. तिसरे, हे रेनकोट सच्छिद्र नसल्याने ते परिधान केल्यानंतर कमालीचे गरम होत असत. त्यामुळे या उणिवा दूर करण्याच्या दृष्टीने प्रयोग सुरू झाले. जगाच्या इतिहासात अनेक शोध युद्धांमुळे लागले आहेत. दोन्ही जागतिक महायुद्धे हा या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत.
सध्या पावसाळा सुरु झाला असला तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिक घरातच आहेत. महत्त्वाच्या कामासाठीच बाहेर पडत आहेत. त्यातच शाळा व महाविद्यालये ही बंद आहेत. त्यामुळे शाळेतील मुलांच्या शालेय साहित्याची सुद्धा खरेदी केलेली नाही. शाळा व महाविद्यालये कधी सुरु होणार हे निश्चित नसल्याने छत्री आणि रेनकोटच्या खरेदीसाठी कोण बाहेर पडत नाही. खासगी उद्योग व कार्यालये सुरु नसल्याने कर्मचारी बाहेर पडत नाहीत. तर काहीजणांचे घणातूनच काम सुरु आहे. त्यामुळे खरेदीवर परिणाम होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.