esakal | अन्‌ मंगळवेढा तालुक्यात पुन्हा राष्ट्रवादीला आले अच्छे दिन
sakal

बोलून बातमी शोधा

The story of Politics in NCP in Mangalvedha taluka

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर राष्ट्रवादीच्या पाठीशी उभा असलेल्या मंगळवेढ्यात 2009 च्या विधानसभेनंतर राष्ट्रवादीच्या बुरुजाला तडा गेला. परंतु तब्बल ११ वर्षांनंतर मंगळवेढ्यातील राष्ट्रवादीला पुन्हा अच्छे दिन आले.

अन्‌ मंगळवेढा तालुक्यात पुन्हा राष्ट्रवादीला आले अच्छे दिन

sakal_logo
By
हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर राष्ट्रवादीच्या पाठीशी उभा असलेल्या मंगळवेढ्यात 2009 च्या विधानसभेनंतर राष्ट्रवादीच्या बुरुजाला तडा गेला. परंतु तब्बल ११ वर्षांनंतर मंगळवेढ्यातील राष्ट्रवादीला पुन्हा अच्छे दिन आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेवेळी तत्कालीन आमदार माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे हे पवारांचे खंदे निष्ठावंत समर्थक मानले जात. त्यामुळे त्यांनी जिथे पवार तिथे ढोबळे असे सूत्र जमवले होते. परंतु 2004 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने माजी मंत्री ढोबळे यांच्या जागी डॉ. रामचंद्र साळे यांना संधी दिली. या कालावधीत राष्ट्रवादीचा प्रभाव वाढू शकला नाही. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर 2009 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना मंगळवेढा- पंढरपूर मतदार संघात संधी दिली. 
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
यामध्ये अनपेक्षितरित्या राष्ट्रवादीचा बुरूज ढासळला. रिडालोसमधून आमदार भालके विजयी झाले. परंतु आमदार भालके यांनी मंगळवेढ्यात विधानसभेची बांधणी करण्यापूर्वी राष्ट्रवादीतील परिचारक गटाच्या व माजी मंत्री ढोबळे यांच्या गटातील काही समर्थकांना जवळ केले. त्यामुळे 2009 नंतर राष्ट्रवादीच्या ढासळलेल्या बुरुजानंतर तालुक्यात पक्षाचा प्रभाव वाढू शकला नाही. 2014 ला आमदार भारत भालके यांनी रिडालोसची साथ सोडत थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2014 ते 19 या कालावधीमध्ये तालुक्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्यात नेतृत्व ठरवण्यात आमदार भालके यांची महत्त्वाची भूमिका होती. परंतु आमदार भालकेच्या अडचणीच्या काळात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी अपेक्षित लक्ष दिले नसल्यामुळे आमदार भालके यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवारांशी जवळीक साधत विधानसभा 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवेशानंतर मंगळवेढ्यात पुनश्च एकदा राष्ट्रवादीचा आमदार झाला. परंतु राज्यात सत्तास्थापनेत नाट्यमय घडामोडीमुळे आज राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेत सहभागी झाला.  त्यामुळे मंगळवेढेकरांना सत्ताधारी पक्षाचा आमदार मिळाल्यामुळे राष्ट्रवादीला गतवैभव मिळाले. तर दुसर्‍या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी सोबत असलेल्या माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी पक्षाची साथ सोडत कमळाच्या सावलीला गेले. त्यामुळे तब्बल ११ वर्षांनंतर मंगळवेढ्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वर्धापनदिन साजरा करताना आमदार भारत भालके यांच्या नेतृत्वाखाली महिला जिल्हाध्यक्ष अनिता नागणे, अल्पसंख्य सेलचे लतीफ तांबोळी, मागासवर्गीय सेलचे विजयकुमार खवतोडे, तालुकाध्यक्ष सुनील डोके, संदीप बुरकुल, प्रज्वल शिंदे या प्रमुख राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे.

loading image
go to top