
अक्कलकोट : विटांची वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक ट्रकने रस्त्यावर थांबलेल्या दोन वाहनांना जोरदार धडक देऊन झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात विटांचा ट्रक उलटला. या अपघातात चारजण जखमी झाले असून, वाहनांचे सुमारे दीड लाख रुपयाचे नुकसान झाले. हा अपघात अक्कलकोट- मैंदर्गी बायपास रस्त्यावर झाला. याची अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.