
NCP District President Umesh Patil addressing party workers to strengthen organization at grassroots.
Sakal
-राजकुमार शहा
मोहोळ: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा कार्यकारणी व विविध सेल विभागाच्या निवडीचा कार्यक्रम मोहोळ येथे पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहिर करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना उमेश पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांना पूर्णवेळ पक्ष कार्यासाठी झटण्याचे व राष्ट्रवादीचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी परिश्रम घ्यावे. येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीसाठी या निवडी महत्त्वाच्या मानल्या जातात, याचा फायदा पक्षाला होणार आहे.