
-राजकुमार शहा
मोहोळ : नुकताच श्रावण सुरू झाला आहे. श्रावणात अनेक विविध सणांची रेलचेल असते. हे सण सर्व सामान्यांना शांततेत व निर्भय वातावरणात साजरे करता यावेत, तसेच येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शना खाली मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे व त्यांच्या अन्य कर्मचारी सहकार्यानी मोहोळ शहरातून मंगळवारी सायंकाळी पथ संचलन केले.