
-भारत नागणे
पंढरपूर : भाळवणी (ता.पंढरपूर) येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची उभारणी तालुक्यातील सभासद, शेतकरी आणि कामगारांच्या घामातून झाली आहे. कारखाना स्थापनेत अनेक आजी माजी संचालकांचे योगदान आहे. सभासद आणि कामगारांच्या मालकीचा हा साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास देऊ नये. तरीही कल्याणराव काळे यांनी अधिकाराचा दुरोपयोग करुन कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतल्यास कारखाना घेणार्या उद्योगपतीला कारखान्यात पाय ठेवू देणार नाही, प्रसंगी आमच्या जीवाची बाजी लावू, असा इशारा कारखान्याचे माजी संचालक दीपक पवार व डाॅ. बी. पी. रोगे यांनी दिला आहे.