

Vote Counting Delayed After Strong Room Key Lost in Dudhani Solapur
Esakal
Nagar Panchayat Election: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे निकाल आता समोर येत आहेत. २८८ नगरपरिषद आणि नगरपंचायतीची मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, काही ठिकाणी मतमोजणीवेळी गोंधळ झाल्याचंही दिसून आलंय. सोलापुरातील दुधणी इथं चक्क स्ट्राँग रूमची चावीच हरवल्याचा प्रकार समोर आला. अधिकाऱ्यांकडे चावी नसल्यानं शेवटी स्ट्राँग रूमचं कुलूप तोडण्यात आलं आणि त्यानंतर मतमोजणीला सुरुवात झाली.