
Bhuyanje Villagers Walk 11 Km Amid Rahulanagar Flood Struggle
Sakal
माढा: गावाला पुराचा वेढा, गावात लाईट नाही, पिण्याचे पाणी संपले, उद्यापासून पाणी पाणी करत बसावे लागेल, त्यामुळे आम्ही सर्व बाहेर निघालो अशी प्रतिक्रिया राहुलनगरच्या ग्रामस्थांनी दिली. पुराच्या पाण्याचा वेढा बसलेल्या राहुलनगर येथील ग्रामस्थांनी चिखल तुडवत, पाण्यातून मार्ग काढत अकरा किलोमीटरची पायपीट करत बार्शी तालुक्यातील भुईंजे या गाव गाठले. यात तरुणांबरोबरच महिला, वृद्ध, लहान मुलांचा समावेश आहे. या लोकांनी स्वतःचा बचाव यशस्वीपणे केला.