esakal | नोकरीची हमी देणाऱ्या अभ्यासक्रमांची चलती ! अकरावीची दुसरी गुणवत्ता यादी 85 टक्‍क्‍यांवर 'क्‍लोज'
sakal

बोलून बातमी शोधा

student

कला, वाणिज्य शाखेला प्रवेश न घेता बहुतेक विद्यार्थी विज्ञान शाखेला पसंती देत आहेत. तर बहुतेक विद्यार्थ्यांनी आयटीआय, पॉलिटेक्‍निक, एमसीव्हीसी अशा व्यावसायिक शिक्षणाला पसंती दिली आहे.

नोकरीची हमी देणाऱ्या अभ्यासक्रमांची चलती !

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पदवी मिळूनही नोकरी (Job) मिळत नाही, बेरोजगारीदेखील वाढली आहे, उच्च शिक्षणानंतरही (Higher education) स्वप्न, अपेक्षा पूर्ण करणारा जॉब मिळत नाही, या विचारातून दहावीनंतर बहुतेक विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणापेक्षा व्यावसायिक शिक्षणाला (Vocational education) महत्त्व दिल्याची सध्याची स्थिती आहे. अकरावी प्रवेशाच्या दोन्ही यादीतून ते स्पष्ट झाले असून, नोकरी तथा व्यवसायाची हमी देणाऱ्या अभ्यासक्रमांकडेच विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल आहे.

हेही वाचा: राज्य सेवेच्या पूर्व परीक्षेचा 'या' दिवशी निकाल! 2019 चा निकाल लांबला

कोरोनामुळे दहावीची परीक्षा न झाल्याने जिल्ह्यातील जवळपास 63 हजार विद्यार्थ्यांपैकी 70 टक्‍क्‍यांहून अधिक विद्यार्थी प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण झाले आहेत. टक्‍केवारी अधिक पडल्याने विद्यार्थ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. कला, वाणिज्य शाखेला प्रवेश न घेता बहुतेक विद्यार्थी विज्ञान शाखेला पसंती देत आहेत. तर बहुतेक विद्यार्थ्यांनी आयटीआय, पॉलिटेक्‍निक, एमसीव्हीसी अशा व्यावसायिक शिक्षणाला पसंती दिली आहे. गतवर्षीच्या तुलनेत अकरावी प्रवेशाच्या मेरिट यादीची टक्‍केवारी घसरली असून दुसरी गुणवत्ता यादी 85 टक्‍क्‍यांवर "क्‍लोज' झाली. मागच्या वर्षी 90 ते 91 टक्‍क्‍यांपर्यंत गुण घेतलेली मुले दुसऱ्या प्रवेश फेरीत होते. यंदाची परिस्थिती पाहून आता ग्रामीणमधील बहुतांश महाविद्यालयांनी "ऑन द स्पॉट' प्रवेश द्यायला सुरू केले आहे. तर शहरातील महाविद्यालयांनी 50 टक्‍के प्रवेश "ऑन द स्पॉट' करून उर्वरित प्रवेश गुणवत्ता यादीनुसार करण्याचे धोरण स्वीकारले आहे, असे माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी म्हणाले.

पारंपरिक शिक्षणानंतर रोजगार अथवा नोकरीच्या संधी मिळतील की नाही, याची शाश्‍वती विद्यार्थ्यांना वाटत नाही. त्यामुळे यंदा बरेच विद्यार्थी व्यावसायिक शिक्षणाकडे वळले असून आयटीआय, पॉलिटेक्‍निकला प्रवेश घेत आहेत.

- अशोक भांजे, शिक्षण विस्ताराधिकारी, सोलापूर

हेही वाचा: शाळा बंदमुळे अल्पवयीन मुलींच्या कपाळी बाशिंग !

दुसऱ्या गुणवत्ता यादीचा "कट ऑफ'

  • वालचंद कॉलेज : 87.80 टक्‍के

  • आर. एस. चंडक कॉलेज : 87.40 टक्‍के

  • ए. डी. जोशी कॉलेज : 84.40 टक्‍के

  • भारती विद्यापीठ : 86 टक्‍के

  • डी. बी. एफ. दयानंद कॉलेज : 85 टक्‍के

  • डी. ए. व्ही. वेलणकर कॉलेज : 71 टक्‍के

loading image
go to top