

Education Hit Hard: Village School Shuts Down Owing to Teacher Leave Issue
Sakal
-हुकूम मुलाणी
मंगळवेढा: तालुक्यातील उचेठाण येथील जैन हरिजन वस्तीतील शिक्षकाने वैयक्तिक कारणास्तव रजा काढल्यामुळे रजेसाठी शाळेलाच सुट्टी देण्याचा अजब प्रकार घडला. शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे तालुक्यात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे तीन-तेरा वाजू लागले आहेत. एकीकडे ग्रामपंचायती करमाफी करून शाळा टिकविण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे शिक्षण विभागाकडूनच शिक्षक नसल्याने शाळा बंद ठेवल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. परिणामी नाइजास्तव गरिबांच्या मुलांना खासगी शाळांत जावे लागत आहे.