नीट परीक्षेत सोलापुरातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश 

logo
logo
Updated on

सोलापूर : नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या मार्फत सप्टेंबर 2020 मध्ये घेण्यात आलेल्या नीट राष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय पात्रता पूर्व परीक्षेत भारतातून 14 लाख 37 हजार विद्यार्थी बसले होते. सोलापूर शहर व परिसरातील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. 

संगमेश्वर महाविद्यालय 
संगमेश्‍वर महाविद्यालयातील साक्षी हेडगीरे 565, चैत्राली कुलकर्णी 565, शिवकुमार उपासे 549, ऋषिकेश होनमाने 534 या विद्यार्थ्यांनी पाचशेहून अधिक गुण घेऊन महाविद्यालयात अव्वल येण्याचा मान मिळवला. पात्रताधारक विद्यार्थी या प्रमाणे रोहित काकडे 405, छाया शिंदे 396, ओम पाटील 391, प्राजक्ता कांबळे 384, प्रतीक्षा पाटील 376, श्वेता पवार 355, आदित्य निकम 347, अंजली निंबर्गी 343, आदित्य निंबाळकर 339, सचिन सिलिंग 316. या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे. या प्रसंगी पालक प्रतिनिधी जयराज हेडगिरे, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. प्रमोद उडगिकर, प्रा. रामराव राठोड, प्रा. रवी कट्टी, भाषा समन्वयक प्रा. शिवराज पाटील, प्रा. सुषमा पाटील, प्रा. लीना खमितकर, प्रा. प्रशांत शिंपी, प्रा. नागेश कोल्हे, प्रा. विशाल जत्ती, समन्वय डॉ. गणेश मुडेगावकर, प्रा. रोहन डोंगरे, प्रा. संतोष पवार आदी उपस्थित होते. 
 
ए. डी. जोशी कनिष्ठ महाविद्यालय 
ए. डी.जोशी कनिष्ठ महाविद्यालयातील 50 विद्यार्थ्यांना पाचशे पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. या विद्यार्थ्यांना वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाचा प्रवेश मिळेल असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष ए. डी. जोशी यांनी व्यक्त केला. या परीक्षेमध्ये या महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांना 600 पेक्षा जास्त गुण तर 32 विद्यार्थ्यांना 500 पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ए. डी. जोशी, सचिव अमोल जोशी, सायली जोशी, प्राचार्य प्रवीण देशपांडे यांच्यासह सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले आहे. या महाविद्यालयातील केरप्पा मेटकरी, अभिषेक केसकर, विजयराज गुंड, रितेश पवार, भैरवनाथ कोणदे, अंशिता देसवाल, ऋतुजा हुंबे, ईशा जोशी, सौरभ सलगर, श्रुती कदम, अफिया बेनीशिरूर, सर्फराज तांबोळी, दिव्या ईटकुडे, ओंकार बंडगर, अभय कोरे, पायल निकम, सुशांत सुरवसे, वैष्णवी टकले, प्रेमसाई खरटमल, पंकज सुरक, वेदांत झाड, सुदर्शन मोहिते, शांभवी जोशी, सौरभ इंगळे, नीरज बिराजदार, शेखर जमदाडे, विशाल खुने, तन्मय जगदाळे, विश्वनाथ पुजारी, तेजश्री गज्जम, आशा होनमाने, पुनम गायकवाड या विद्यार्थ्यांनी पाचशेहून अधिक गुण मिळविले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com