पोलिस दलातील संघर्षयोध्दा कोरोनाचा बळी

पोलिस दलातील संघर्षयोध्दा कोरोनाचा बळी
Summary

त्यांची कारकिर्द बहरत असतानाच कोरोनाने त्यांचा बळी घेतला. जवळपास महिनाभराची त्यांची झुंज अपयशी ठरली.

सोलापूर : शहरातील ज्या पोलिस चौकीत त्यांनी कॉन्स्टेबल म्हणून ड्यूटी जॉईन केली. त्याचठिकाणी राहूल बोराडे (Rahul borade) हे पोलिस उपनिरीक्षकपदी ((sub inspector) रूजू झाले. जिद्द, चिकाटी अन्‌ मेहनतीतून राहूल यांनी 2017 मध्ये एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु, तो संघर्षयोध्दा कोरोनाचा (Corona) बळी ठरला. पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना त्यांची प्राणज्योत मालवली. (sub inspector in a solapur of police rahul borade died due to corona)

पोलिस दलातील संघर्षयोध्दा कोरोनाचा बळी
कोरोनाच्या मृत्यूपासून एक लाख सहा हजार व्यक्‍ती सुरक्षित

दुसऱ्या लाटेत आतापर्यंत शहरातील 28 हजार 348 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील एक हजार 383 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यात आता पोलिस उपनिरीक्षक बोराडे यांचा समावेश झाला. बोराडे यांना 3 मे रोजी कोरोनाची बाधा झाली होती. तत्पूर्वी, त्यांचे आई-वडील, सात वर्षीय मुलगीही कोरोना पॉझिटिव्ह आली होती. उपचारातून ते सर्वजण बरे झाले, परंतु बोराडे हे उपचार घेऊन काही दिवस घरी परतले होते. त्यानंतर त्रास वाढल्याने पुन्हा सोलापुरातील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मंगळवारी (ता. 8) मृत्यू झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

पोलिस दलातील संघर्षयोध्दा कोरोनाचा बळी
बालविवाह वाढूनही बाल कल्याण समित्या झोपलेल्याच

बालपणापासून पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून राहूल यांनी मेहनत घेतली. पोलिस कॉन्स्टेबल म्हणून रूजू झाल्यानंतर त्यांचा विवाह झाला. त्यानंतरही त्यांनी जिद्द सोडली नाही आणि 2017 मध्ये एमपीएससीच्या माध्यमातून ते पोलिस उपनिरीक्षक झाले. त्यांच्या कार्याचे कौतूक होत असतानाच त्यांना जोडभावी पेठ पोलिस ठाण्याअंतर्गत गुन्हे प्रकटीकरण पथकात संधी मिळाली. त्यांची कारकिर्द बहरत असतानाच कोरोनाने त्यांचा बळी घेतला. जवळपास महिनाभराची त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांचा एक भाऊ विशाल बोराडे हे विजापूर नाका पोलिसांत कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत.

पोलिस दलातील संघर्षयोध्दा कोरोनाचा बळी
कंत्राटी भरतीला 'वित्त'ची परवानगी! दहा टक्‍क्‍यांचीच मर्यादा

बोराडे यांना चार वर्षीय मुलगा अन्‌ सात वर्षीय मुलगी

संघर्ष करून एमपीएससीच्या माध्यमातून पोलिस अधिकारी झालेले राहूल बोराडे यांचे मंगळवारी कोरोनामुळे निधन झाले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्यांची तब्बेत सुधारली होती आणि लवकरच त्यांना घरी सोडले जाईल, असे डॉक्‍टरांनीही सांगितले होते. मात्र, पुन्हा त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर शहर पोलिस दलातील बहुतेक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमधील व्हॉट्‌सअप स्टेटसवर त्यांचा फोटो पहायला मिळाला. दरम्यान, त्यांच्या पश्‍चात आई-वडील आहेत. तसेच त्यांची पत्नी आणि चार वर्षाचा मुलगा आणि सात वर्षाची मुलगी आहे. (sub inspector in a solapur of police rahul borade died due to corona)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com