ग्रामीण भागात तर आता वेगळीच अडचणय... (Video)

Such an effect on the rural area of Corona
Such an effect on the rural area of Corona

सोलापूर : जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसने ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनात खूप मोठ्या प्रमाणात भिती निर्माण केली आहे. लॉकडाऊनमध्ये सरकारने अत्यावश्‍यक सेवा सुरु ठेवल्या आहेत खऱ्या पण ग्रामीण भागात पीठ सुद्धा गिरणीत दळून दिलं जात नसल्याचे चित्र समोर आलं आहे. याला दुसरीही काही कारणं जोडली जात आहेत, मात्र कोरोना हेही त्यात एक कारण आहे.

हेही वाचा : सोलापूरकरांसाठी खुषखबर ! शहरात दहा ठिकाणी फ्लू केंद्रे
महिनाभरापासून कोरोना महाराष्ट्रात हातपाय पसरत आहे. त्याची लागण झालेल्या रुग्णांची दिवसांदिवस वाढ होत आहे. त्याला रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. म्हणूनच सध्या देशभर लॉकडाऊन सुरू आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत आसल्याने सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे.  सध्या संचारबंदी लागू असून यामध्ये अत्यावश्‍यक सेवा सुरु ठेवली आहे. ग्रामीण भागात सुद्धा याचा परिणाम जाणवत आहे. यातूनच काही ठिकाणी पिठाच्या गिरणी सुद्धा बंद केल्या आहेत. काही ठिकाणी तर दळण सुद्धा दळूण दिले जात नसल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये फक्त कोरोना हे एकच कारण नसून त्याला इतर सुद्धा करणे आहेत. मात्र, कोरोनाची नागरिकांच्या मनात भिती आहे.

हेही वाचा : धक्कादायक बातमी ! सोलापुरातील सारीच्या रुग्णांना झालाय कोरोना
कोरोनामुळे सध्या ग्रामीण भागात सुद्धा नागरिक काळजी घेत आहेत. महिला घरातच बसून उन्हाळ कामे करत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात हरभरा व तूरीची डाळ करण्याचे काम त्यांचे सुरु असते. सध्या अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसीत होत असली तरी सुद्धा अनेक महिला घरीच जात्यावर डाळी करत आहेत. याबाबत वैजंता मुरुमकर म्हणाल्या, डाळी करण्यासाठी आजही आम्ही जात्याचा वापर करतोत त्याच्या मशिन निघाल्या असल्या तरी सुद्धा उन्हाळ्यात घरीच डाळी तयार करुन ठेवल्या जातात.
हरभरा आणि तूर पाण्यात भीजू घालवून पुन्हा वाळायला टाकायचे आणि पुन्हा वाळल्यानंतर ते जात्यात दळायचे. दळून झाल्यानंतर त्याला वाऱ्यात उपणून डाळ तयार होते. हरभऱ्याची सुद्धा अशीच डाळ होते. उन्हाळ्यात डाळींबरोबर पापड, पापड्या, कुरडई ही सुद्धा कामे केली जातात. 
कोरोनामुळे गिरणीत दळून देण्यावर सुद्धा परिणाम झाला आहे. दळून दिले जात नलस्याचे सांगितले जात आहे. आमच्याबाबत असा प्रकार झाला नाही, मात्र. गावात याबाबत चर्चा आहे. याला दुसरंही कारण असू शकतं, असंही त्या म्हणाल्या. अनेकजण एकाच ठिकाणी दळण दळतात मात्र, काहीजण किरकोळ कारनामुळे आता दळण दुसरीकडे देतात. त्यामुळे नवीन दळण दळायला घेतले जात नसल्याची शक्यता आहे. कोरोनाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, सध्या घरात बसून तरी काय करायचे म्हणून घरातली काम करण्यावर भर दिला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com