Sugar
सोलापूर - राज्याला दरमहा सरासरी तीन लाख टन साखर लागते. सध्या राज्यात १८ लाख टन साखर शिल्लक आहे. मात्र, दिवाळीच्या मुहूर्तावर आता साखरेची मागणी वाढली आहे. दिवाळीपूर्वीच खुल्या बाजारात साखरेचे दर ८० रुपये किलो झाले असून, पुढे भाव शंभरी पार करेल, अशी भीती सामान्यांना आहे. राज्यातील साखर दक्षिणेकडील राज्यांनाही पुरवली जाते, त्यामुळे साखरेचा साठा व्यापारी करणार नाहीत, याकडे आता पुरवठा विभागाची पथके लक्ष देऊन आहेत.