
करमाळा तालुक्यामध्ये साखर कारखान्यांचा ऊसतोडणी कार्यक्रम नियमानुसार न होता तोडणी वाहतूकदारांच्या मर्जीप्रमाणे सुरू आहे.
नातेवाईक, राजकीय हितसंबंध पाहून साखर कारखान्यांचा ऊसतोडणी कार्यक्रम
केत्तूर - करमाळा तालुक्यामध्ये साखर कारखान्यांचा (Surag Factory) ऊसतोडणी (Sugarcane Cutting) कार्यक्रम नियमानुसार न होता तोडणी वाहतूकदारांच्या (Transporter) मर्जीप्रमाणे सुरू आहे. वाहतूकदारांकडून नातेवाईक, (Relatives) शेजारी-पाजारी राजकीय हितसंबंध (Political Relation) पाहून तोडणीस प्राधान्य (Priority) दिले जात आहे. त्यामुळे सर्व सामान्य शेतकरी भरडला जात आहे.
सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलेल्या तारखेप्रमाने तोड न देता वीस ते पंचवीस दिवस उशिरा तोड दिली जात आहे. तोडणीस आलेल्या उसाला 10 दिवस आदी पाणी बंद करावे लागते. त्यात पुन्हा तोडणीसाठी विलंब होत असल्याने वजनात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. कारखान्यांची ऊस तोडणी यंत्रणा कुचकामी ठरत असून धनदांडगे शेतकरी कारखान्यातील अधिकाऱ्यांशी लागेबांधे करत स्वत:चा ऊस घालवत आहेत. त्यात ऊसतोडणी वाहतूकदारांचा मनमानी कारभार. त्यामुळे सर्व सामान्य शेतकरी हवालदिल झाला आहे. फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला तरी ऊसतोड होण्यास विलंब होत आहे. परिणामी बहुतांश उसाला तुरे आले असल्याने ऊस आतून पोकळ होऊन वजनात घट होत आहे. तालुक्यातील ऊस मकाई सहकारी साखर कारखाना, भैरवनाथ शुगर, कमलाभवानी, बारामती ऍग्रो, अंबालिका कारखाना, श्रीराम शुगर, इंदापूर सहकारी कारखाना आदी कारखान्यांमार्फत नेला जात आहे.
हेही वाचा: केगाव- हत्तूर बायपास शुक्रवारपासून होणार वाहतुकीस खुला
उजनी बॅकवॉटरमध्ये अद्याप मोठ्याप्रमाणावर ऊस शिल्लक आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात ऊस उभा आहे, अशा शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली आहे. मात्र, याकडे कारखान्यांचे लक्ष नसल्याचे चित्र आहे. अनेक प्रयत्न करून ऊस तोडणीसाठी टोळी मिळाली तरी टोळीतील कामगार, वाहनमालक यांच्याकडून शेतकऱ्यांची मोठ्याप्रमाणावर आर्थिक लूट होत आहे. एकीकडे उसाचे वजन घटत आहे, तर दुसरीकडे तोडणीसाठी होणारी आर्थिक लूट अशा दुहेरी संकटामध्ये शेतकरी अडकला आहे. मात्र, तालुक्यातील लोकप्रतिनिधी, राजकीय नेते आणि कारखानादारांना याचे काहीही देणेघेणे नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
कारखान्यांकडून नियमानुसार ऊसतोडणी नाही
करमाळा तालुक्यात सहा ते सात कारखान्यांमार्फत ऊसतोडणी सुरू आहे. परंतु कुठल्याच कारखान्यांमार्फत नियमानुसार तोडणी होत नाही. वाहतूकदारांकडून नातेवाईक, राजकीय हितसंबंध बघून ऊस तोडणी करण्यात येत आहे. त्यामुळे लहान व सामान्य शेतकरी भरडला जात आहे, असा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे.
Web Title: Sugarcane Cutting Program Of Relatives Political Relations Priority
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..