esakal | पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची धडाकेबाज कारवाई!
sakal

बोलून बातमी शोधा

 satpute-

गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांच्या नेतृत्वाखाली बेगमपूर येथील हातभट्टी तयार करणाऱ्या भट्टीवर छापा टाकला.

पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची धडाकेबाज कारवाई!

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: हातभट्टी दारु विक्रेत्यांना त्या अवैध व्यवसायापासून परावृत्त करून त्यांना चांगल्या व्यवसायासाठी प्रोत्साहित करण्यासाठी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ऑपरेशन परिवर्तन सुरु केले आहे. त्याअंतर्गत बेगमपूर (ता. मोहोळ) आणि भानुदास तांडा व मुळेगाव तांडा (ता. दक्षिण सोलापूर) येथील हातभट्टी दारू गाळणाऱ्या भट्टीवर छापा मारून 48 हजार 200 लिटर गुळमिश्रित रसायन नष्ट केले.

हेही वाचा: महिन्यात दोन्ही डोस घ्या! 'नॅक'साठी सोलापूर विद्यापीठाचे अजब आदेश

गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांच्या नेतृत्वाखाली बेगमपूर येथील हातभट्टी तयार करणाऱ्या भट्टीवर छापा टाकला. पोलिसांना पाहून आरोपी पळून गेला. त्याठिकाणी रसायनाच्या 10 बॅरलमधील दोन हजार लीटर रसायन नष्ट केले. संशयित आरोपी दत्ता तुळजाराम भोई याच्याविरुद्ध कामती पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक खेडकर, पोलिस हवालदार सचिन वाकडे, धनाजी गाडे, समीर शेख, अनिसा शेख, सरस्वती सुगंधी यांच्या पथकाने ही कारवाई केली. पहिल्याच दिवशी दहा लाख 15 हजार 950 रुपयांचे रसायन नष्ट करण्यात आले. भानुदास व मुळेगाव तांडा येथील हातभट्टी तयार करणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकताना स्वत: पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: अफगाणमधून विद्यार्थ्याने दिली सोलापूर विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा

हातभट्टी तयार करणाऱ्यांचे समुपदेशन

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत ग्रामीण पोलिसांनी 11 जणांवर कारवाई केली. त्यांच्यासह परिसरातील तरूणांना पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी समुपदेशन केले. त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांनी यावेळी संबंधितांना मार्गही सांगितला. हातभट्टी निर्मितीच्या तांड्यातून शासकीय अधिकारी, उद्योजक तयार व्हावेत, हा व्यवसाय कायमचा बंद व्हावा, यासाठी पोलिस अधीक्षकांनी प्रयत्न सुरु केला आहे.

loading image
go to top