
पोलिस अधीक्षकांची तांड्यावरील महिलांसोबत 'परिवर्तन' होळी
सोलापूर : अवैध व्यवसाय, गुन्हेगारीचा शेवट हा वाईटच होतो, त्यामुळे अनेक पिढ्या बरबाद होतात, याची जाणीव-जागृती केल्यानंतर मुळेगाव तांड्यातील अनेकांनी हातभट्टी दारू तयार करण्याचा व विक्रीचा व्यवसाय सोडून समाजमान्य व्यवसाय निवडला. त्यांच्यासोबत पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी होळी साजरी केली. त्यावेळी मुळेगाव तांडा पूर्णपणे हातभट्टी दारुमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला.
हेही वाचा: सोलापूर : गुणवत्तावाढ सोडाच,पुरेसे शिक्षकही नाहीत
विधायक काम यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे हातभट्टी दारु व्यवसाय बंद करताना नुसत्या कारवाया करून चालणार नाही. त्यासाठी त्या व्यवसायिकांचे पहिल्यांदा मनपरिवर्तन करायला हवे, तो व्यवसाय बंद केल्यानंतर त्यांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून द्यावा लागेल, त्यांच्या मुलांचा नोकरीचा प्रश्न, कुटुंबातील महिलांना घरबसल्या रोजगार दिल्यास निश्चितपणे परिवर्तन होईल, असा विश्वास पोलिस अधीक्षक सातपुते यांना होता. त्यानुसार त्यांनी अधिकारी व अंमलदारांना सूचना केल्या. त्यांनी जॉब फेअर राबविला आणि पोलिस पाल्यांसह तांड्यातील व पारधी समाजातील जवळपास तरुणांना नोकरी मिळवून दिली. त्यांच्या कामाची दखल गृहमंत्रालयाने घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही त्यांचे कौतुक केले. दणकेबाज कारवाईतून नाव कमावणाऱ्यांपेक्षाही त्याच लोकांमध्ये मिसळून त्या कुटुंबांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून परावृत्त करणाऱ्या पोलिस अधीक्षक सातपुते त्यांच्यात 'हिरो' ठरत आहेत. त्यामुळे मुळेगाव तांड्यातील लोकांनी त्यांना होळीचे निमंत्रण दिले आणि त्यांनी त्याठिकाणी हजेरी लावून त्यांच्यासोबत सण साजरा केला.
हेही वाचा: सासरच्यांकडून 'ती'चा हुंड्यासाठी छळ! महिलांना 'भरोसा' अन् 'शक्ती'ही मिळेना
लोकसहभागातून मुळेगाव तांड्याचे 'परिवर्तन'
पोलिस दलात दाखल झाल्यानंतर काहीकाळ तेजस्वी सातपुते यांना सोलापूर ग्रामीणमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी हातभट्टी दारु तयार करणारे गाव म्हणून मुळेगाव तांड्याची ओळख ग्रामीणचे पोलिस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतरही तशीच होती. अवैध व्यवसायिकांचे मन व मत परिवर्तनाची जोखीम स्वीकारून त्यांनी सुरवातीला तेथील लोकांच्या अपेक्षा, उदरनिर्वाहाची साधने, तयार केलेली हातभट्टी दारू कोणत्या गावात विक्री होते, याची माहिती संकलित केली. लोकसहभागाशिवाय 'ऑपरेशन परिवर्तन' यशस्वी होणार नसल्याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे त्यांनी तेथील महिला व तरुणांना सोबत घेऊन हातभट्टी तयार करणारे व विकणाऱ्यांचे मत यशस्वीपणे परिवर्तन करुन दाखविले.
हेही वाचा: 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान 'या' वर्षांतील शेतकऱ्यांनाच मिळणार
Web Title: Superintendent Of Police Tejaswi Satputes Parivartan Holi With Women From Mulegaon
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..