सोलापुरात शरद पवारांचा "एम' फॅक्‍टर!

सोलापुरात शरद पवारांचा "एम' फॅक्‍टर!
NCP president Sharad Pawar
NCP president Sharad Pawar esakal
Summary

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि सोलापूरचे नाते तसे जुनेच आहे.

सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि सोलापूरचे (Solapur) नाते तसे जुनेच आहे. सोलापूरचे पालकमंत्री म्हणून काम करताना पवारांनी सोलापूर शहराशी नाते जोडले. सोलापुरातील पवारांचा खास माणूस म्हणून ओळख असलेली आजपर्यंत अनेक माणसं नावारूपाला आली. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पवारांनी सोलापूरच्या राजकारणात अनेक प्रयोग केले. ते प्रयोग तात्पुरते व स्थानिक पातळीवर यशस्वी झाले. सोलापूर शहरातून घड्याळाचा आमदार अन्‌ महापौर मात्र अजूनही झाला नाही. मनोहर सपाटे (Manohar Sapate) अन्‌ महेश गादेकरांनी (Mahesh Gadekar) घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढविली; परंतु त्यांना अनामत रक्कमही राखता आली नाही. या दोन 'एम.'नंतर पवारांनी महेश कोठेंच्या (Mahesh Kothe) माध्यमातून नव्या राजकीय (Political) आणि सामाजिक प्रयोगाला सुरुवात केली आहे. (The political debate is going on in the city whether Sharad Pawar's M factor will be successful)

NCP president Sharad Pawar
'HDFC'चा ग्राहकांना अलर्ट मेसेज! 1 जानेवारीपासून बदलणार 'हा' नियम

लिंगायत (Lingayat), पद्मशाली (Padmashali), दलित, मुस्लिम (Muslim) या प्रमुख समाजांच्या निर्णयावर सोलापूर शहराच्या राजकारणाची दिशा ठरते. राष्ट्रवादीने अलीकडच्या काळात सोलापूर शहरात मराठा (Maratha) समाजातील नेत्यांना केंद्रबिंदू मानत राजकारण केले. सोलापुरातील राष्ट्रवादीचा हा जुना 'एम' फॅक्‍टर पक्षवाढीला मर्यादित ठेवून गेला. सोलापुरात राष्ट्रवादीचे सर्वाधिक नुकसान केलेल्या एमआयएमची (MIM) व्होटबॅंक (Vote Bank) फोडण्यासाठी नव्याने आखलेल्या समीकरणात मराठासोबतच मुस्लिम, पद्मशाली या समाजावर राष्ट्रवादीने विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. सिद्धेश्‍वर साखर कारखान्याच्या (Siddheshwar Sugar Factory) माध्यामातून राष्ट्रवादीकडून लिंगायत समाजाचा सॉफ्टकॉर्नर मिळविण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. पवारांनी सोलापूरच्या राजकारणात महेश कोठेंच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा नवा मोहरा समोर आणला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी कोठेंना महापालिकेच्या मैदानात त्यांची ताकद दाखवावी लागणार आहे.

शरद पवारांचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेले मनोहर सपाटे 1994 मध्ये सोलापूरचे महापौर होते. त्यावेळी सपाटेंची क्रेझ होती, आमदारकीची संधीही होती. तरीही त्यांना 1995, 1999, 2004, 2009 आणि 2014 या पाचपैकी एकाही निवडणुकीत साधी उमेदवारीही मिळाली नाही. आमदारकीच्या पहिल्या प्रयत्नासाठी सपाटेंना 2009 मध्ये बंडखोरी करावी लागली. सोलापुरातील निष्ठावंतांकडे दुर्लक्ष आणि सोलापुरातील मूठभर राष्ट्रवादीत प्रचंड गटबाजी अशा दोन्ही बाजू त्याला कारणीभूत होत्या. या दोन्ही बाजू आता राष्ट्रवादीने सुधारून घेतल्याचे दिसते. पवारांनी सोलापुरातील नव्या राजकीय समीकरणात मनोहर सपाटे, महेश कोठे व महेश गादेकर यांना एकाच छताखाली ठेवले आहे. गादेकर सध्या सक्रिय राजकारणाला सोडून व्यावसायिक झाले आहेत. सपाटे व कोठे अद्यापही सक्रिय राजकारणात कार्यरत आहेत. एकामेकांच्या आमदारकीचे स्वप्न धुळीस मिळविलेल्या या तिघांना सोलापूरच्या राजकारणात उघडपणे सोबत ठेवण्याची किमया सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांना जमली नाही ती किमया पवार यांनी करून दाखविली आहे.

NCP president Sharad Pawar
राष्ट्रवादीतील गटबाजीला तिलांजली द्या! प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सूर

राष्ट्रवादीला टोमणा सातशे मतांचा

2014 च्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर मतदार संघातील राष्ट्रवादीची उमेदवारी महेश गादेकर यांना होती की मनोहर सपाटे यांना होती? कोणाची उमेदवारी कोणी पळविली? याचे उत्तर आजही गुलदस्त्यातच आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शहर मध्यमधून राष्ट्रवादीच्या तत्कालीन नगरसेविका खैरुन्नबी सोडेवाले यांचे प्रबळ नाव असतानाही विद्या लोलगे यांना कशी संधी मिळाली?, या मतदारसंघात अनेक तुल्यबळ उमेदवार असताना, तत्कालीन शहराध्यक्ष महेश गादेकर यांचे नाव या मतदार संघासाठी चर्चेत असताना कॉंग्रेसला पूरक उमेदवार राष्ट्रवादीकडून कसा आला? हे प्रश्‍न देखील आजही अनुत्तरितच आहे. लोलगे यांनी आमदारकीची निवडणूक लढवेपर्यंत शहर मध्यमधून राष्ट्रवादीचे सात ते आठ नगरसेवक निवडून येत होते. शहर मध्यमधील सातशे मतांचे मालक असा टोमणा तेव्हापासून ते आजतागायत राष्ट्रवादीला सहन करावा लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com