

A 222 km section of the Surat–Chennai corridor will now be developed under the BOT model following Bharatmala deadline expiry.
Sakal
-विठ्ठल सुतार
सोलापूर : केंद्र शासनाने भारतमाला योजनाच रद्द केल्याने सुरत-चेन्नई महामार्गाचे काम लांबणीवर पडले आहे. आता सुरत-चेन्नई महामार्ग ग्रीनफिल्ड नाशिक ते अक्कलकोट (२२२ किमी) मार्ग बीओटी तत्त्वावर (बांधा, वापरा व हस्तांतर) देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळासमोर ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावास लवकरच मंजुरी मिळेल आणि प्रत्यक्षात नोव्हेंबर २०२६ पासून कामास सुरुवात होणार आहे.