

“Paranda’s Suresh Suravase preserves Vasudev folk tradition; an inspiring example of education with culture.”
Sakal
- विजयकुमार कन्हेरे
कुर्डुवाडी : पदवीपर्यंचे शिक्षण घेऊनही परांडा तालुक्यातील सुरेश सुरवसे यांनी गेल्या अनेक पिढ्यांपासूनचा वासुदेव परंपरेचा वारसा पुढे सुरु ठेवला आहे. दरवर्षी ते व त्यांचे सहकारी दत्तात्रय कानडे हे धाराशिवच नाही तर सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा यासह मराठवाड्यातील जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जात वासुदेव परंपरेच्या माध्यमातून संस्कृतीचे जतन करत आहेत.