सोलापूर जिल्ह्यातील ५ लाख कुटुंबांचा सर्व्हे पूर्ण! सर्वेक्षणासाठी ७५०० कर्मचारी; आज शेवटचा दिवस

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी केला जाणारा सर्वे सध्या अंतिम टप्प्यात आहे. सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख ९४ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाणार होते. त्यापैकी आतापर्यंत ८० टक्के कुटुंबांचे सर्वेक्षण झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे.
sakal exclusive
sakal exclusivesakal

सोलापूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी केला जाणारा सर्वे सध्या अंतिम टप्प्यात आहे. सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख ९४ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाणार होते. त्यापैकी आतापर्यंत ८० टक्के कुटुंबांचे सर्वेक्षण झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे. या सर्वेक्षणात पाच लाख कुटुंबांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

राज्य मागासवर्ग आयोगाच्यावतीने केलेल्या जाणाऱ्या या सर्वेसाठी सुरुवातीला ३१ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. सर्वेचे काम अपूर्ण राहिल्याने व सुरुवातीच्या टप्प्यात सर्वे दरम्यान तांत्रिक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे सर्वेचा वेग मंदावला होता. सर्वेसाठी आयोगाने उद्यापर्यंतची (शुक्रवार, ता. २) मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत जास्तीत जास्त काम पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशिल दिसत आहे. सर्वेच्या कामासाठी जिल्हा प्रशासनाने सहा हजार ९५३ प्रगणकांची नियुक्ती केली होती. या प्रगणकांवर पर्यवेक्षण करण्यासाठी ५१५ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले होते. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून या सर्वेच्या कामाला गती आली होती.

  • सोलापूर शहरातील एक लाख कुटुंबाचे सर्वेक्षण;

  • सर्व्हेसाठी ९०० जणांची नियुक्ती; आज शेवटची मुदत

सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टीने राज्य मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्व्हे केला जात आहे. १४९ प्रश्नांची उत्तरे मोबाइल ॲपवर भरून अपलोड केली जात आहेत. सोलापूर शहरातील दीड लाख कुटुंबांपैकी आतापर्यंत जवळपास एक लाख कुटुंबांचा सर्व्हे झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे. मराठा समाजातील कुटुंबांचा आर्थिक, सामाजिक मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी हा सर्व्हे फार महत्त्वाचा मानला जात आहे. सर्वेक्षण करताना मराठा कुटुंबाबरोबरच इतर समाजातील कुटुंबांचाही सर्व्हे अपेक्षित आहे.

प्रत्येक घराचा सर्व्हे झाल्यावर त्याठिकाणी आयोगाच्या माध्यमातून सर्वेक्षण झाल्याचे मार्किंग बंधनकारक आहे. मात्र, अनेक कुटुंबांची माहिती ॲपवर अपलोड झाली आहे पण त्या घरावर मार्किंग दिसत नाही अशी वस्तुस्थिती आहे. अनेकांनी मराठा आणि इतर कुटुंबांचा सर्व्हे घरी किंवा कार्यालयात बसून केल्याचेही सांगण्यात आले. दुसरीकडे ज्यांना सर्वेक्षणासाठी नेमले त्या कर्मचाऱ्यांनी खासगी व्यक्तींना नेमून अधिकाऱ्यांच्या परस्पर सर्व्हे केल्याची बाब देखील सोलापूर शहरात समोर आली. दरम्यान, मनुष्यबळाची उपलब्धता, ॲपमधील तांत्रिक अडचणींमुळे या सर्व्हेसाठी दोन दिवसांची वाढीव मुदत मिळाली. आता उद्या (शुक्रवारी) सर्वेक्षणाचा शेवटचा दिवस असणार आहे. सोलापूर महापालिकेने गुरूवारी (ता. १) साडेचारशे कर्मचारी वाढविले असून त्यांना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पर्यवेक्षक अन्‌ अधिकाऱ्यांचा वॉच

शहरातील प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे झाला आहे की नाही, याची पडताळणी महापालिका अधिकारी व पर्यवेक्षकांच्या माध्यमातून केली जात आहे. कोणीही खासगी त्रयस्थ व्यक्ती नेमून सर्व्हे केल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही महापालिकेने दिला आहे. उद्या (शुक्रवारी) शहरातील उर्वरित ५० ते ५५ हजार कुटुंबांचा सर्व्हे पूर्ण करण्याचे आव्हान त्या ९०० कर्मचाऱ्यांवर विशेषत: शिक्षकांवर असणार आहे.

आज सर्वेक्षण पूर्ण होईल

शहरातील जवळपास दीड लाख कुटुंबांचा सर्व्हे करण्यासाठी आम्ही ९०० कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. मुदत कमी असल्याने गुरूवारी ४५० शिक्षक वाढविले असून उद्या (शुक्रवारी) १०० सर्व्हे पूर्ण होईल असे नियोजन करण्यात आले आहे.

- निखील मोरे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका, सोलापूर

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com