Sushma Andhare : 'दादा लाव रे व्हिडिओ, आज धुरळाच काढते..!' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sushma andhare shows videos of political leaders solapur politics

Sushma Andhare : 'दादा लाव रे व्हिडिओ, आज धुरळाच काढते..!'

सांगोला : "दादा लाव रे व्हिडिओ, आज धुरळाच काढते.." तेरा वर्षांपूर्वीचा 14 सेकंदाचा व्हिडिओ काढून माझी प्रतीकात्मक तिरडी बांधण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु आजवर याविषयी अनेकांनी अक्षपार्ह विधाने केली त्याबद्दल भाजप काहीच कसे बोलत नाही. याबाबत सुषमा अंधारे यांनी सभेमध्ये अनेक व्हिडिओच दाखवले.

ना हिंदुत्वासाठी, ना निधीसाठी हे गेले स्वतःच्या स्वार्थी 50 खोक्यासाठी 40 गद्दार दादांनी नियत बदलली" असल्याचे विधान सुषमा अंधारे यांनी केले. सांगोला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेल्या सभेमध्ये सुषमा अंधारे बोलत होत्या.

यावेळी शिवसेना नेत्या संजनाताई घाडी, सोलापूरचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, सहसंपर्क प्रमुख साईनाथ अभंगराव, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, शिवसेना प्रवक्ते लक्ष्मण हाके, शरद कोळी, तालुकाप्रमुख सूर्यकांत घाडगे, युवा सेना सोशल मीडियाचे आयोद्या पोळ, पुनम अभंगराव, शहरप्रमुख कमरूद्धीन खतीब, भारत मोरे, युवासेनेचे तालुकाप्रमुख सुभाष भोसले, शहर प्रमुख सौरभ चव्हाण, तुषार इंगळे, गोरख येजगर, अरविंद पाटील, अस्लम मुलानी, नवल गाडे, शंकर मेटकरी आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

या सभेमध्ये बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, 'मी सभेमधून जे प्रश्न विचारते आहे त्यावर बोलण्यापेक्षा, माझ्या प्रश्नांची उत्तर देण्यापेक्षा भाजप मला अडकविण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु कायदा माझ्या बापाने लिहिला असल्यामुळे मी कधीच या जाळ्यात अडकू शकत नाही. 13 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ पुढील मागील संदर्भ काढून हवे ते मजकूर सोशल मीडियावर भाजपद्वारे प्रसिद्ध केले जात आहे. परंतु या अगोदर रविशंकर, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेले आक्षेपहार्य लिखाण, भिडे गुरुजींची बातमी, निवृत्ती महाराजांचे व इतरांचे प्रवचने तसेच पंतप्रधान मोदी व इतर भाजप नेत्यांनी केलेले विधाने आज सभेमध्ये व्हिडिओच दाखवले. यावर भाजपचे नेते काहीच का बोलत नाहीत ?

असा सवालही अंधारे यांनी उपस्थित केला. आज उद्योग गुजरातला, गाव कर्नाटकला तर नेते गुुवाहटीला जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु आम्ही काय करायचं यासाठी आज महाराष्ट्रभर महाप्रबोधन यात्रा करीत आहोत. भागवत संप्रदाय कधीही चमत्काराला थारा देत नाही. परंतु माझ्या विधानाचे चुकीचे अर्थ काढून माझ्यावर टीका केली जात आहे. राज्यपाल पदाबद्दल मला आदर आहे, परंतु व्यक्तींबद्दल त्यांनी केलेल्या महाराष्ट्राबद्दल, येथील नेत्यांबद्दल उद्गाराबद्दल मी त्यांचा निषेध व्यक्त करते. यावेळी तुषार इंगळे, जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव यांनी आपली मनोगत व्यक्त केली तर संभाजी शिंदे यांनी प्रस्ताविक केले.

बापू काय ओके नायं..!

आमदार शहाजी बापू पाटील यांचे विषयी बोलताना अंधारे म्हणाले की, शहाजी बापू माझे दादा सत्तेसाठी नेहमी लाचारी करतात. तालुक्यातील माझ्या या भावांने वसंतराव दादा सूतगिरणीचे, पतंगराव क्रेडिट सोसायटीचे, राधाकृष्ण संघाचे, एका कुटपालनाचे काय झाले या प्रश्नाचे तुम्ही अगोदर उत्तरे द्या. शहाजी बापू तालुक्याला निधी देत नाहीत म्हणून मिंदे गटात गेल्याचे सांगतात. त्यांचाच तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी आणल्याचा व मरेपर्यंत शिवसेना सोडणार नसल्याचा व्हिडिओ त्यांनी सभेमध्ये दाखविला. आज तालुक्याला टक्केवारीचे ग्रहणच लागले आहे असेही अंधारे म्हणाल्या.

ताई सेनेबद्दल बोला...

या महाप्रबोधन सभेमध्ये आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर टीकाटिप्पणी करताना स्वर्गीय गणपतराव देशमुख (आबासाहेब) यांच्याविषयी व शेतकरी कामगार पक्षाच्या पन्नास वर्षाच्या कार्यकाळाबद्दल बरेच बोलून गेल्या. यावेळी शेवटी पत्रकारांनी या व्यासपीठावर सेनेबद्दल बोलण्यापेक्षा तुम्ही शेकापबद्दल जास्त बोलला असे विचारले असता मला शहाजी बापू काय आहे एवढेच सांगायचे होते. महाप्रबोधन यात्रा असून ही प्रचार सभा नसल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले.