esakal | वेळापूरच्या आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सुयश जाधव यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस
sakal

बोलून बातमी शोधा

Suyash Jadhav

संकटातही संधीचा प्रकाश शोधून जलतरण क्रीडा विभागात आंतरराष्ट्रीय सुवर्णझेप घेणाऱ्या सुयश यांची पार्श्वभूमी देशातील तरुणांना प्रेरणादायी आहे. लहानपणी विजेच्या तारांचा संपर्क येऊन झालेल्या दुर्दैवी अपघातात दोन्ही हात कोपरापासून गमावलेल्या सुयश जाधव यांनी त्यांचे वडील आणि क्रीडाशिक्षक नारायण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेला जलतरण सरावाचा प्रवास 125 आंतरराष्ट्रीय पदकांसह पॅरा ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता हा देदिप्यमान प्रवास थक्क करणारा आहे. 

वेळापूरच्या आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सुयश जाधव यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

sakal_logo
By
अशोक पवार

वेळापूर (सोलापूर) : माळशिरस तालुक्‍यातील वेळापूरचे सुपुत्र, महाराष्ट्र शासनाचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू, पॅरा ऑलिंपिक सुवर्णपदक विजेते आणि सध्याचे महाराष्ट्र शासनाचे क्रीडा मार्गदर्शक वर्ग एकचे अधिकारी सुयश नारायण जाधव यांची या वर्षीच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केलेल्या महाराष्ट्रातील सात खेळाडूंची निवड नुकतीच घोषित करण्यात आली आहे.  

हेही वाचा : "यांच्या'मुळे वाचले कोरोनाग्रस्तांचे 33 लाखांचे बिल ! "इतक्‍या' रुग्णांना लाभ 

संकटातही संधीचा प्रकाश शोधून जलतरण क्रीडा विभागात आंतरराष्ट्रीय सुवर्णझेप घेणाऱ्या सुयश यांची पार्श्वभूमी देशातील तरुणांना प्रेरणादायी आहे. लहानपणी विजेच्या तारांचा संपर्क येऊन झालेल्या दुर्दैवी अपघातात दोन्ही हात कोपरापासून गमावलेल्या सुयश जाधव यांनी त्यांचे वडील आणि क्रीडाशिक्षक नारायण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेला जलतरण सरावाचा प्रवास 125 आंतरराष्ट्रीय पदकांसह पॅरा ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता हा देदिप्यमान प्रवास थक्क करणारा आहे. 

आशियाई द्वीप समूहातील देशांचा फास्टेस्ट स्वीमर ठरलेल्या सुयश जाधव यांना महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्कारासह जलतरण क्रीडा मार्गदर्शक अधिकारी वर्ग एक, बालेवाडी पुणे येथे संधी देऊन बहुमान केला आहे. 

हेही वाचा : गणेशाची मूर्ती कशी असावी? स्थापना कधी, पूजा कशी करावी? जाणून घ्या पंचांगकर्ते दातेंकडून 

अर्जुन पुरस्कारासाठी निवड निश्‍चित झाल्यानंतर सुयश जाधव यांच्यावर वेळापूर परिसर आणि जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील, आमदार राम सातपुते, खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सतीशराव माने - देशमुख, अमरसिंह माने - देशमुख, सरपंच विमल जानकर, उपसरपंच जावेद मुलाणी, सुरभी पतसंस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील, वेळापूर येथील विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी सुयश जाधव यांचे अभिनंदन केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top