Swabhimani Farmers March in Solapur
esakal
मोहोळ : शेतकऱ्यांच्या उसाला दर ठरवून मिळावा या मागणी साठी सोमवार ता 16 रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या मोर्चाची जय्यत तयारी सुरू झाली असून, गावोगावी बैठका मोबाईल द्वारे मेसेज च्या माध्यमातून शेतकऱ्यात जनजागृती करण्यात येत आहे. बैठकांना प्रचंड प्रतिसादही मिळत आहे. जिल्हा तालुका व गाव पातळी वरील "स्वाभिमानी" चे कार्यकर्ते कामाला लागल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी दिली.