कृषिदिनी आंदोलन!' शेतकऱ्यांची ऊसबिले तत्काळ द्यावीत'; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
Solapur News : जिल्हाधिकाऱ्यांनी साखर आयुक्तांच्या आरसीसी आदेशाची अंमलबजावणी करून तत्काळ ऊसबिले जमा करावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले आहे.
Swabhimani Shetkari Sanghatana leads protest on Krishi Din demanding pending sugarcane bill payments.Sakal
उ.सोलापूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उसाची थकीत रक्कम तत्काळ द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. आरआरसीच्या कारवाईबाबत जिल्हाधिकारी उदासीन असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला आहे.