
सोलापूर: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत २९८ पैकी २८६ गुण मिळवून काव्या नीलेश देशमुख हिने राज्यात पाचवा क्रमांक व सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सध्या ती कुर्डुवाडीतील आदर्श पब्लिक स्कूलमध्ये शिकत आहे. यावर्षी राज्यातील ५ लाख ४७ हजार ५०४ विद्यार्थ्यांनी पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा परीक्षा दिली होती.