Sword Attack : व्याजाच्या पैशासाठी एकावर कोयत्याने हल्ला; चौघांविरुद्ध सलगरवस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Solapur Crime : व्याजाचे पैसे का देत नाही अशी विचारणा करीत धरा रे याला म्हटले. धनंजय याने कोयत्याने डोक्यावर मारले. त्यामुळे ते खाली पडल्यावर सर्वांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
Four individuals have been charged after a sword attack over loan money at Salgarvasti. The police have filed a case for assault and violence in a financial dispute."
Four individuals have been charged after a sword attack over loan money at Salgarvasti. The police have filed a case for assault and violence in a financial dispute."Sakal
Updated on

सोलापूर : व्याजाच्या पैशासाठी चौघांनी एकावर कोयत्याने हल्ला केला. तसेच हॉकी स्टिक व लाथाबुक्क्यांनी त्याच्यासह त्याच्या पत्नीलाही मारहाण केली. त्यात तो जखमी झाला. गुरुवारी (ता. २७) रात्री ८.३० च्या सुमारास देगाव रस्त्यावरील श्रीराम नगरात ही घटना घडली. याप्रकरणी त्या चौघांविरुद्ध सलगरवस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com