esakal | करमाळ्यात रेमडेसिव्हीरचा काळाबाजार? व्हायरल ऑडिओ क्‍लिपमुळे खळबळ ! तहसीलदारांचे चौकशीचे आदेश

बोलून बातमी शोधा

Remdesivir
करमाळ्यात रेमडेसिव्हीरचा काळाबाजार? व्हायरल ऑडिओ क्‍लिपमुळे खळबळ ! तहसीलदारांचे चौकशीचे आदेश
sakal_logo
By
अण्णा काळे : सकाळ वृत्तसेवा

करमाळा (सोलापूर) : रेमडेसिव्हीर इंजेक्‍शनबाबत करमाळा पंचायत समितीतील एक अधिकारी व एक खासगी डॉक्‍टर यांच्यातील संवादाची एक ऑडिओ क्‍लिप व्हायरल झाली आहे. यावरून यात गैरव्यवहार होत असल्याची चर्चा आहे. याची करमाळा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. त्याची चौकशी करण्याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकांत खरात व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर गायकवाड यांना आदेश दिले असल्याची माहिती तहसीलदार समीर माने यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

दरम्यान, करमाळ्यात मिळालेल्या इंजेक्‍शनमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही. त्याच्या सर्व नोंदी आहेत. मात्र कुठलेही इंजेक्‍शन असले तरी त्याचा काळाबाजार करता येत नाही. याची सर्व चौकशी केली जाणार असल्याचे तहसीलदार माने यांनी सांगितले आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्‍शनसंदर्भात आर्थिक व्यवहाराशी संबंधित बोलणे असल्याची क्‍लिप सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. राज्यात सध्या रेमडेसिव्हीर इंजेक्‍शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच करमाळा पंचायत समितीचे एक अधिकारी रेमडेसिव्हीरची बेकायदा विक्री करत असल्याचे दिसत आहे. यामध्ये सबंधित जाधव नाव असलेली व्यक्ती डॉक्‍टरांना सात हजार रुपये मागत आहे. तर संबंधित डॉक्‍टर 17 हजार रुपये दिले असून 5 हजार रुपये राहिले असल्याचे सांगत आहे. याची करमाळ्याचे तहसीलदार समीर माने यांनी गंभीर दखल घेतली आहे.

हेही वाचा: बुधवारी एका दिवसात आढळले 1878 रुग्ण ! 38 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

तहसीलदार माने म्हणाले, रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन करमाळ्यात किती आले, कोणत्या रुग्णांना दिले, याची सर्व माहिती आहे. त्यातून गैरव्यवहार होणे शक्‍य नाही. मात्र, व्हायरल क्‍लिपनुसार संबंधितांची चौकशी करण्याचा आदेश देत आहे. या चौकशीत कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ही इंजेक्‍शन्स आपली नसली तरी त्यावर कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले.