
आणखी काही दिवस खबरदारी घ्या! सोलापूरसह चार तालुक्यातून कोरोना हद्दपार
हेही वाचा: एक मुलगी, अनेकांसोबत जमविले विवाह! सांगोला, साताऱ्यातील तरुणांना फसवणारे जेरबंद
सोलापूर : सोलापूर शहर कोरोनामुक्त झाले असून 1 ते 18 मार्च या काळात शहरात अवधे सात रुग्ण आढळले. शहर कोरोनामुक्त झाल्यानंतर मागील तीन दिवसांपासून शहरात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. तर ग्रामीणमधील काही तालुके कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर असून सध्या बार्शी, माळशिरस, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर हे चार तालुके कोरोनामुक्त झाले आहेत. पण, जगातील काही देशांमध्ये चौथी लाट आल्याने नागरिकांना काही दिवस खबरदारी घ्यावी लागेल, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
हेही वाचा: झेडपीच्या 43 शाळांना लागणार टाळे? कोरोनामुळे ढासळली 'प्राथमिक' गुणवत्ता
शहरातील 33 हजार 660 व्यक्तींना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी एक हजार 505 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे ग्रामीणमधील एक लाख 86 हजार 36 व्यक्तींना कोरोनाने गाठले. त्यातील तीन हजार 726 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. सध्या शहरात कोरोनाचा एकही रुग्ण नसून ग्रामीणमधील 21 रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाची तिसरी लाट सुरु होण्यापूर्वी भीती वर्तविण्यात आली, पण तीव्र लक्षणे नसलेल्या रुग्णांमुळे प्रशासनावरील ताण कमी झाला. दरम्यान, तिसरी लाट आता पूर्णपणे ओसरली असून 1 ते 18 मार्च या काळात शहरात सात तर ग्रामीणमध्ये 106 रुग्ण वाढले आहेत. तर शहरातील एकाचा तर ग्रामीणमधील दोघांचा मृत्यू झाला आहे. मार्च महिन्यातील 18 दिवसांत तब्बल दहा दिवस शहरात एकही रुग्ण आढळला नाही. तरीही, नागरिकांना मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून काही दिवस आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस टोचून घ्यावेत, असेही आवाहन केले आहे.
हेही वाचा: सोलापूर : रस्त्यांवर वाहनांची विनाकारण अडवणूक
50 हजाराच्या मदतीसाठी हेलपाटे
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून 50 हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार जिल्ह्यातील पाच हजार 229 रुग्णांच्या वारसांना ती मदत मिळायला हवी. अनेकांनी मदतीसाठी ऑनलाइन अर्ज केले, त्याची पडताळणी होऊन शासनाकडे मदतीसाठी ते पाठविण्यातही आले. मात्र, अर्ज करून एक-दीड महिने होऊनही अनेकांना मदत मिळालेली नाही. मृतांच्या वारसदारांना मदतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. घरातील कर्ता गेल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न मोठा गंभीर आहे.
Web Title: Take A Few More Days Of Cautioncorona Deported From Four Talukas Including
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..