

Citizens presenting complaints on illegal constructions during the Janata Darbar session in Solapur.
Sakal
सोलापूर: महापालिका हद्दीत मंजूर आराखड्याविरुद्ध बेकायदा बांधकाम व परवानगीशिवाय हॉटेल व्यवसाय चालविणाऱ्या बिल्डरांविरुद्ध महापालिकेने चौकशी करून कारवाई करण्याबाबतचे आदेश लोकअदालतीत देण्यात आले होते. मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याने तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशा मागणीचे निवेदन अनुसरत सुलताना गुलाबसाब दखनी यांच्यासह तिघांनी जनता दरबारात दिले.