सोलापूर : पेन्शन, विमा व मॅच्युरिटीचे करमुक्त लाभ

एसबीआय लाईफची न्यू प्लॅटिना प्लॅन जाहीर
Tax free benefits of pension insurance and maturity SBI Life announces new platinum plan solapur
Tax free benefits of pension insurance and maturity SBI Life announces new platinum plan solapuresakal

सोलापूर : पेन्शन योजनेचा लाभ मिळवू इच्छिणार्या व्यक्तीसाठी विमा संरक्षण, पेन्शन व हयातीनंतर वारसास लाभ अशी तिहेरी लाभाची करमुक्त न्यू प्लॅटिना अश्युअर्ड योजना एसबीआय लाईफने जाहीर केली आहे. एसबीआय लाईफने ही योजना नुकतीच जाहीर केली आहे. हा प्लॅन ट्रॅडिशनल प्रकारचा आहे. पण तो ॲटपार म्हणजे सर्व प्रकारच्या निश्चित परताव्याच्या आधारावर असलेली योजना आहे. अनेक व्यक्तींना शासकीय पेन्शन योजना नसल्याने त्यांच्या वृद्धापकाळात आर्थिक प्रश्न निर्माण होतात.

तसेच वृद्धापकाळात विमा सरंक्षण देखील मिळत नाही. तेव्हा या स्थितीत त्यांना निश्चित महिनेवारी पेन्शनरूपी आर्थिक मदतीची गरज असते. अनेक योजनांमध्ये मूळ रकमेपासून ते मॅच्युरिटी रकमेवर कर लागत असल्याने त्यांच्या आर्थिक लाभात कपात होते. पण वृद्धापकाळातही ही आर्थिक कपात देखील असह्य होते. त्यामुळे या योजनेत करमुक्तीचे लाभ मिळाले आहेत. प्रिमियमच्या रकमेवर ८० सी अंतर्गत करमुक्तीचा लाभ होतो. तर मॅच्यूरिटीची रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे. यामध्ये एलपीपीटी (लिमिटेड प्रिमियम पेईंग टर्म) महत्त्वाचे ठरते.

ठळक बाबी

  • किमान प्रिमियम ५० हजार रुपये व किमान सात वार्षिक हप्ते

  • योजनेचा कालावधी किमान २३ ते ४१ वर्षे

  • पूर्ण मुदतीपर्यंत विमा संरक्षण

  • नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यूसाठी विमा भरपाई

  • मॅच्युरिटी रक्कम करमुक्त

  • किमान २५ वर्षांसाठी वार्षिक पेन्शन रक्कम

  • एकूण हप्त्याच्या रकमेच्या तुलनेत ११० टक्के परतावा

  • पे आउट किंवा डेथ बेनिफिटचे दोन पर्याय उपलब्ध

  • वय ३० दिवसाच्या बाळापासून ते ६० वर्षांपर्यंत सहभागीत्वाची वयोमर्यादा

  • ९९ वर्षांपर्यंत परिपक्वता कालावधी

मी माझ्या वृद्ध आईसाठी हा प्लॅन घेतला. वृद्धांना कोणतेही विमा संरक्षण या वयात मिळत नाही, तसेच त्यांना पेन्शन देखील मिळत नाही. या दोन्हीचा लाभ मिळावा यासाठी मी योजनेत सहभाग नोंदवला.

- प्रभू कोंडा, जुने विडी घरकुल, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com