

Teacher Agitation Escalates: Government Initiates ‘No Salary’ Action
Sakal
सोलापूर : शिक्षकांच्या शाळा बंद आंदोलनात शुक्रवारी (ता. ५) सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांसह खासगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक सहभागी होणार आहेत. पण, विद्यार्थीहित लक्षात घेऊन आंदोलनात सहभागी होणाऱ्या शिक्षकांना रजा मिळणार नाही. त्यामुळे आंदोलनातील शिक्षकांना एक दिवसाची पगार मिळणार नाही, असे आदेश शिक्षण संचालकांनी काढले आहेत. त्यानुसार आंदोलनात सहभागी शिक्षकांची माहिती मुख्याध्यापक शिक्षणाधिकाऱ्यांना देतील.