शिक्षकांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आत्मसात करावे : डॉ. नेहा बेलसरे 

education policy new.jpg
education policy new.jpg
Updated on

दक्षिण सोलापूर (सोलापूर) ः विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणाची गरज ओळखून सर्व शिक्षकांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 आत्मसात करावे, असे आवाहन शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेच्या संचालक व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणेच्या उपसंचालक डॉ. नेहा बेलसरे यांनी केले. 

विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान आणि शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने "राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नवे बदल, नवी दिशा' या विषयावर ऑनलाईन व्याख्यान झाले. 

हेही वाचाः वीरशैव लिंगायतचा रविवारी राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा 

त्यांनी सध्या शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदलाची आवश्‍यकता स्पष्ट करून शिक्षक व विद्यार्थी यांची बदललेली भूमिका अगदी सहज सोप्या भाषेतून मांडली. शिक्षक म्हणजे शिकविणे नाही तर शिकण्यास मदत करणारा दुवा व्हावा ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हा ऑनलाईन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान आणि शि.प्र. मंडळी या दोन्ही संस्थांचे पदाधिकारी, सदस्यांनी प्रयत्न केले. रंगनाथ बंकापूर यांनी प्रास्ताविक केले. कै. वि.मो. मेहता प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रुती बागेवाडी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. मधुरा देशपांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी शाळा समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन व संघटना पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Flood Relief Stalled in Solapur 13000 Eligible Farmers Still Waiting for 46 Crore Compensation After Heavy Rains
Pune Satara Solapur Get Relief as Bhatghar Dam Becomes Full Water Discharge Starts Into Nira River
Professors will now mark biometric attendance in class biometric attendance
solapur Police Raid on MD Drugs
Marathi News Esakal
www.esakal.com