
-प्रमिला चोरगी
सोलापूर : होटगी रोड विमानतळावरील हवामानाची माहिती देणारी दृश्यमापन यंत्रणा कुचकामी ठरल्याने विमानसेवा शुभारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या येणाऱ्या विमानाला येथून रेड सिग्नल मिळाला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विमानाचे मुंबईहून उड्डाण झाले नाही. त्यामुळे त्यांचा नियोजित सोलापूर दौरा रद्द झाला. दुसरीकडे पहिल्याच दिवशी गोव्याचे विमान उड्डाण तीन तास उशिराने झाले.