

MLA Ranjitsinh Shinde praises Tembhurni No.1 Society for achieving a ₹1.38 crore deposit milestone in the District Central Bank.
Sakal
- संतोष पाटील
टेंभुर्णी: टेंभुर्णी नंबर 1 सोसायटीचे 521 सभासद असून या सोसायटीने जिल्हा मध्यवर्ती बँकेत 1 कोटी 38 लाख रूपयांच्या ठेवी ठेवल्या आहेत. कोणत्याही वित्तीय संस्थेत राजकारण कमी आणि पारदर्शक कारभार व पंचकमिटीवर सभासदांचा विश्वास असेल तर त्या वित्तीय संस्थेची उत्तम रितीने प्रगती होते हे टेंभुर्णी नंबर 1 सोसायटीने दाखवून दिले आहे. सोसायटीचे चेअरमन डी.के.देशमुख व त्यांच्या संचालक मंडळाने अतिशय काटकसरीने कारभार करून अडचणीच्या परिस्थितीतून मार्ग काढून हे यश प्राप्त केले आहे असे प्रतिपादन जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी केले.