
Solapur Crime
Sakal
सोलापूर: शहरातील विजापूर रोडवरील बाहुबली जैन मंदिरातील मौल्यवान आठ मूर्ती आणि परिसरातील रेवणसिद्धेश्वर मंदिरासमोरील धानम्मा देवीच्या दानपेटीतील सहा हजार रुपये चोरी झाले होते. संशयित चोरटे मंदिराचा दरवाजा तोडताना सीसीटीव्हीत कैद झाले होते. शहर गुन्हे शाखेच्या पथकाने तिन्ही संशयितांना २४ तासांत जेरबंद करीत चोरलेला ऐवज हस्तगत केला आहे.