
सोलापूर : परिचारिकांचा संप सलग चौथ्या दिवशी सुरुच आहे. संपकरी परिचारिकांच्या मागण्या समजावून घेण्याच्या ऐवजी शासनाने परिविक्षाधिन परिचारिकांना नोटिसा पाठवण्याचा प्रकार सुरु केला आहे. त्यामुळे संपकरी परिचारिका संतप्त झाल्या आहेत. मुंबईच्या आझाद मैदानावर सध्या परिचारिका संघटनांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील आरोग्य सेवेत काम करणाऱ्या परिचारिकांनी बेमुदत संप सुरु केला आहे. आज या संपाचा चौथा दिवस आहे.