esakal | 23 ऑगस्टपर्यंत अकरावी प्रवेशाची सीईटी! "या' जिल्ह्यांमध्ये थेट प्रवेश प्रक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

CET

23 ऑगस्टपर्यंत अकरावी प्रवेशाची सीईटी! "या' जिल्ह्यांमध्ये थेट प्रवेश

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार आहे. परंतु, सद्य:स्थितीत ऑफलाइन परीक्षा घेणे अशक्‍य आहे. त्यामुळे ही परीक्षा ऑनलाइन होणार असून वस्तुनिष्ठ प्रश्‍नांवर आधारित प्रश्‍नपत्रिका असणार आहे.

सोलापूर : अकरावी प्रवेशासाठी सीईटी (CET Exam) घेतली जाणार आहे. परंतु, सद्य:स्थितीत ऑफलाइन परीक्षा घेणे अशक्‍य आहे. त्यामुळे ही परीक्षा ऑनलाइन होणार असून वस्तुनिष्ठ प्रश्‍नांवर आधारित प्रश्‍नपत्रिका असणार आहे. मुंबई (Mumbai), पुणे (Pune), औरंगाबाद (Aurangabad), नागपूर (Nagpur), कोल्हापूर (Kolhapur) व लातूर (Latur) या जिल्ह्यांमध्येच सीईटी परीक्षा होणार आहे. सोलापूर जिल्ह्यासह उर्वरित जिल्ह्यांमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांना थेट प्रवेश दिला जाणार आहे. (The 11th entrance CET examination will be held by August and some districts will have direct admission-ssd73)

हेही वाचा: सोलापूर जिल्ह्याचा दहावी निकाल 99.27 टक्के

दहावीचा (Tenth Result) निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून, त्यात डिस्टिंक्‍शन व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अकरावी प्रवेशासाठी आता बोर्डाने जोरदार तयारी सुरू केली आहे. तत्पूर्वी, आगामी आठ दिवसांत विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वितरीत केल्या जाणार आहेत. त्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रियेला सुरवात होणार आहे. दरम्यान, ज्या जिल्ह्यांमध्ये दहावीनंतर पुढील प्रवेशाचा पेच अधिक नसतो, प्रवेश क्षमता अधिक आणि विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे, अशा जिल्ह्यांमध्ये सीईटी घेतली जाणार नाही. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय स्तरावर प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यात जवळपास विविध अभ्यासक्रमांच्या अकरावीसाठी एक लाखांपर्यंत जागा आहेत. परंतु, दरवर्षी 60 ते 65 हजारांपर्यंतच प्रवेश होतात. अशीच परिस्थिती काही ठरावीक जिल्हे वगळता सर्वत्रच असल्याचा दरवर्षीचा अनुभव आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये अकरावी प्रवेशासाठी मोठी स्पर्धा असते, त्याच ठिकाणी ऑनलाइन सीईटी घेण्याचे नियोजन पुणे बोर्डाने केल्याचेही सांगण्यात आले.

हेही वाचा: "सीटीईटी'साठी नोंदणी : जाणून घ्या कोण करू शकतात अर्ज

25 जुलैनंतर सुरू होईल प्रवेश प्रक्रिया

ज्या जिल्ह्यांमध्ये अकरावी प्रवेशासाठी स्पर्धा नाही अथवा कमी आहे, प्रवेश क्षमतेच्या तुलनेत कमी प्रवेश होतात, अशा ठिकाणी सीईटी होणार नाही. सोलापूर जिल्ह्यातील प्रवेश प्रक्रिया महाविद्यालय स्तरावर होईल. विद्यार्थ्यांच्या गुणांनुसार मेरिट लिस्ट लावून प्रवेश दिले जातील. 25 जुलैनंतर प्रवेश प्रक्रिया सुरू होईल.

- भास्कर बाबर, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

जिल्ह्यात अकरावीच्या एक लाख जागा

दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांची टक्‍केवारी वाढलेली आहे. त्यामुळे निश्‍चितपणे यंदा कला (Arts), वाणिज्य (Commerce) शाखेच्या तुलनेत विज्ञान (Science) शाखेसह डिप्लोमासाठी (Diploma) विद्यार्थ्यांची गर्दी वाढणार आहे. परंतु, सोलापूर जिल्ह्यामध्ये तशी स्पर्धा पाहायला मिळत नाही. जिल्ह्यात अकरावी प्रवेशाच्या एक लाखाहून अधिक जागा आहेत. तरीही, दरवर्षी त्यातील 40 टक्‍क्‍यांपर्यंत जागा रिक्‍तच राहतात. या पार्श्‍वभूमीवर ज्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी स्पर्धा लागते, त्या ठिकाणी मेरिट लिस्ट लावून विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. परीक्षेचे नियोजन पुणे बोर्डाकडे (Pune Board) असून एखाद्या विद्यार्थ्यास दुसऱ्या जिल्ह्यातील महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असल्यास, तोही सीईटी परीक्षा देऊ शकणार आहे.

loading image